तुमची १५२ बावनकुळं जरी खाली उतरली तरी शिवसेना ठाकरेंपासून तोडू शकत नाही- उद्धव ठाकरे

बावनकुळे साहेब तुमच्या नावाप्रमाणे तरी जागा द्या. तुमची १५२ बावनकुळं जरी खाली उतरली तरी शिवसेना ठाकरेंपासून तोडू शकत नाही.

मालेगाव : एमएसजी कॉलेज मालेगावच्या पटांगणात (MSG College Malegaon) आज झालेल्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी भाजपचा (BJP) ठाकरी शैलीत यथेच्छ समाचार घेतला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) म्हणाले शिवसेनेला (Shivsena) ५० जागा देऊ. बावनकुळे साहेब तुमच्या नावाप्रमाणे तरी जागा द्या. तुमची १५२ बावनकुळं जरी खाली उतरली तरी शिवसेना ठाकरेंपासून तोडू शकत नाही. मिंधेंच्या नावाखाली निवडणुका लढणार का? भाजपनं जाहीर करावं.

भाजप म्हणजे भ्रष्ट झालेला पक्ष. मोदींवर टीका होते तेव्हा भारताचा अपमान कसा? यासाठीच क्रांतिकारक फासावर गेले होते का? अशा शब्दांत त्यांनी भाजपला खडे बोल सुनावले.