राज साहेब काय बोलतील हे शर्मिला वहिनी देखील सांगू शकत नाही त्यामुळे आम्ही काय सांगणार – मनसे आमदार राजू पाटील

आमच्या पक्षाशी गद्दारी केली त्यांना मदत करणार नाही असे सांगत नाव न घेता ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना लक्ष केलं.

    राज साहेब काय बोलतील हे आमच्या शर्मिला वहिनी देखील सांगू शकत नाही त्यामुळे आम्ही काय सांगणार अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली. मनसे महायुतीत सहभागी होणार का? नऊ तारखेला गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना आमदार पाटील यांना जे काही बोलायचं ते नऊ तारखेला बोलतील आणि ते महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताचं बोलतील असा विश्वास व्यक्त केला. आमच्या पक्षाशी गद्दारी केली त्यांना मदत करणार नाही असे सांगत नाव न घेता ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना लक्ष केलं.

    नऊ तारखेला होणाऱ्या गुढीपाडव्याच्या सभेसाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली. आज या पार्श्वभूमीवर मनसेकडून भव्य बाईक रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. मनसे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयात आज उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ कल्याण ग्रामीण मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी आगामी निवडणुकीसाठी राज ठाकरे यांचे आदेश काय आहेत त्यासाठी सगळेच तयार आहोत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. 2019 मध्ये राज ठाकरेंनी 30 दिवस आधी विधानसभा लढवण्यास सांगितले होते.

    मी स्वतः लोकसभा 2014 ला लढलो त्यामुळे इथली लोकसभा क्षेत्राची बांधणी कशी आखणी कशी सगळं आम्हाला माहिती आहे. यावेळेस पण आदेश दिला तर तयार आहोत असे सांगितले. पुढे बोलताना राज ठाकरे यांचे काही आदेश नाहीत त्यामुळे अजून काही ठरलं नाही असे सांगितले. कल्याण लोकसभा मतदारसंघात भव्य बाईक रैलीचे आयोजन मनसे कडून करण्यात आले होते. तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघात जवळपास 500 पदाधिकाऱ्यांची मनसे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.