वर्तमानपत्राचा ‘या’ कारणासाठी आजही सर्रास सुरू असलेला उपयोग आरोग्यासाठी ठरतोय धोकादायक

वर्तमानपत्रावर गरम जेवण, पदार्थ ठेवल्याने अनेकदा पेपरवरची शाई खाद्यपदार्थाला चिकटते. आणि ती पदार्थासोबत आपल्या पोटात जाते. FSSAI 'फूड सेफ्टी अँड स्टँडर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया'ने देखील अनेकदा मुद्रित पेपर ठेवलेले अन्नपदार्थ खाणं आरोग्यासाठी हानीकारक असल्याचं सांगितलं आहे.

  • शाईतील हानिकारक घटक तपासण्यासाठी सरकारने चाचणी प्रयोगशाळा स्थापन कराव्यात : AIPIMA ची मागणी

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी (Food Packaging) वर्तमानपत्राचा वापर (Uses Of Newspapers) करण्यावर बंदी (Banned) घातली असतानाही आजही वर्तमानपत्राचा वापर पॅकिंगसाठी केला जात आहे. वर्तमानपत्र मुद्रणतील शाई (Newspaper Printing Ink) मध्ये हानिकारक घटक (Harmful Elements) असल्यामुळे ही बंदी घातली असली तरी शाईतील रासायनिक घटक तपासण्यासाठी भारतात कुठलीच यंत्रणा नसून त्यासाठी शाई तपासणीसाठी सुसज्ज चाचणी प्रयोगशाळा स्थापन कराव्या (A well-equipped testing laboratory should be set up for ink testing) अशी मागणी ऑल इंडिया प्रिंटिंग ईंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (AIPIMA) केली आहे. मुंबईत नुकतेच ‘एशिया कोट ईंक प्रदर्शन २०२२’ (Asia Coat Inc Exhibition 2022) पार पडले. त्या निमित्ताने वर्तमानपत्राचा वापर खाद्यान्न पॅकिंगसाठी करू नये ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

सविस्तर माहितीनुसार, वृत्तपत्र छापताना ज्या प्रकारच्या शाईचा उपयोग केला जातो, त्यात सोल्युंट हे हानीकारक रसायन असते. हे रसायन इतके हानीकारक असतात की, यामुळे कॅन्सरसारखा आजारही उद्भवू शकतात.

वर्तमानपत्रावर गरम जेवण, पदार्थ ठेवल्याने अनेकदा पेपरवरची शाई खाद्यपदार्थाला चिकटते. आणि ती पदार्थासोबत आपल्या पोटात जाते. FSSAI ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ने देखील अनेकदा मुद्रित पेपर ठेवलेले अन्नपदार्थ खाणं आरोग्यासाठी हानीकारक असल्याचं सांगितलं आहे. पेपरवर असलेली शाई, अन्नपदार्थांद्वारे आपल्या शरीरात जाते म्हणजे एकप्रकारे केमिकलच आपल्या पोटात जातं. यामुळे पचनासंबंधी समस्या होण्याची शक्यता असते.

या केमिकलचा हार्मोन्सवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नुकताच खाद्यांनासाठी वर्तमानपत्राचा वापर करण्यावर बंदी आणली आहे. मात्र भारतात मोठ्या प्रमाणात शाई ही विदेशातून आयात केली जाते. भारतातील कोणतेही उत्पादन अमेरिका किंवा इतर देशात पाठविण्यासाठी अनेक चाचण्या केल्या जातात मात्र भारतात आयात केल्या जाणारे अनेक उत्पादन भारतात बिनधास्त उपलब्ध होतात.

याच पार्श्वभूमीवर भारतातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शाईतील हानिकारक रासायनिक घटक तपासण्यासाठी भारतात चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात याव्या अशी ऑल इंडिया प्रिंटिंग ईंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने केली आहे. तसेच भारतातील शाई उद्योगातून जवळपास १० लाख रोजगार निर्माण झालेले आहेत.

तर मोठ्या प्रमाणात महसूल सरकारला मिळतो तरीही केंद्र सरकार विदेशातून येणाऱ्या शाईला प्राध्यान्य देत आहे. शाई उद्योगासाठी योग्य सरकारी धोरण नसल्यामुळे भारतीय शाई उद्योग (Ink Industry) अडचणीत येऊ शकतो अशी भीती ऑल इंडिया प्रिंटिंग ईंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने व्यक्त केली केली आहे.

भारत हे मुद्रण शाई उत्पादनाचे जगातील प्रमुख केंद्र बनू शकते : राघवन श्रीधरा, अध्यक्ष, एआयपीआयएमए

एआयपीआयएमए’च्या अंदाजानुसार, सुमारे १००,००० असून आणखी सुमारे १२०,००० लोकांना यातून नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत. देशातील संपूर्ण मुद्रण उद्योग जवळपास १५ कोटी लोकांना रोजगार देतो, तसेच वर्तमानपत्र, मासिके, खाद्य पॅकेजिंग आणि सर्व प्रकारच्या पॅकेजिंगच्या छपाईसह मुद्रण शाईच्या गुणवत्तेची आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगतता तपासण्याची सुविधा उपलब्ध असल्यास भारत हे मुद्रण शाई उत्पादनाचे जगातील प्रमुख केंद्र बनू शकते.

जगभरातील उद्योजक शाईच्या पुरवठ्यासाठी भारताकडे डोळे लावून बसले आहेत

जगभरातील मुद्रण शाई उत्पादक हे कच्चा माल आणि शाईच्या पुरवठ्यासाठी भारताकडे डोळे लावून बसले आहेत. कारण युरोपातील भू-राजकीय तणाव आणि डगमगलेल्या आर्थिक परिस्थितीत, चीनला एक प्रभावी आणि विश्वासार्ह अशा पर्यायाचा शोध घेणे हे संपूर्ण जगासाठी क्रमप्राप्त ठरले आहे.

– रवींद्र गांधी, सचिव, आशिया कोट इंक शो २०२२