संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक राज्यांना शुक्रवारी 28 जुलैसाठी रेड आणि ऑरेन्ज अलर्ट दिला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे, रायगड, पालघर तसेच रत्नागिरी जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.दरम्यान पुढील चार पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

    मुंबई : सध्या राज्यात पाऊस धूमाकूळ घालतोय. राज्यात यावर्षी पावसाने (Rain) उशिरा सुरुवात केली आहे. मात्र राज्यातीन अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाने उशिरा सुरुवात केल्यामुळं शेतकऱ्यांनी (farmers) जी परेणी केली होती. त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. तसेच राज्यात सध्या समाधानकारक पाऊस असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं या पावसाचा फटका शेती पिकांना बसला आहे. मागील आठवड्यापासून राज्यातील कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, वसई-विरार, रायगड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, कोल्हापूर, सातारा, विदर्भातील काही जिल्हे, यवतमाळ, मराठवाडा येथे मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागाकडून (Meteorological Department ) अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांना रेड, ऑरेंज व यलो अलर्ट देण्यात आला आहे.

    कुठे ऑरेंज व यलो अलर्ट?

    दरम्यान, कोकणातील रायगड, ठाणे आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसेच गोंदिया जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. त्याचबरोबर सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

    ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

    मागील आठवड्यापासून राज्यातील कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, वसई-विरार, रायगड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, कोल्हापूर, सातारा, विदर्भातील काही जिल्हे, यवतमाळ, मराठवाडा येथे मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, आज, गडचिरोली, गोंदिया आणि नांदेडजिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अवर्ट जारी करण्यात आलाय. तर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्य्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक राज्यांना शुक्रवारी 28 जुलैसाठी रेड आणि ऑरेन्ज अलर्ट दिला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे, रायगड, पालघर तसेच रत्नागिरी जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.दरम्यान पुढील चार पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.