अखेर खोतकर शिंदे गटात सहभागी; उद्धव ठाकरेंची साथ सोडताना अश्रू अनावर

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र अजून निर्णय झाला नसल्याचे खोतकर म्हणाले होते. आज जालन्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा केली आहे.

    जालना : माजी आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी अखेर शिंदे गटात (Shinde Group) जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह शिवसैनिकांशी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचे खोतकर यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याची माहिती देताना खोतकर यांच्या डोळ्यात अश्रू (Tears In Eyes) पाहायला मिळाले.

    खोतकर म्हणाले की, मी शिंदे गटात सहभागी होत आहे. सोबतच माझ्या उपनेते पदाचासुद्धा राजीनामा देणार आहे. माझ्या अडचणी उद्धव ठाकरे यांना सांगितल्या असून स्वतःला सेफ ठेवण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात, असेही खोतकर म्हणाले.

    दिल्ली दौऱ्यावर असलेल्या खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली. त्यामुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र अजून निर्णय झाला नसल्याचे खोतकर म्हणाले होते. आज जालन्यात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा केली आहे.