sharad pawar

भाजपाला लोकांना जामीन मंजूर होतोय. मात्र राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख किंवा नवाब मलिक यांना जामीन नाकारण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाईत भाजप महाविकास आघाडीला वरचढ ठरत आहे का? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. यावर पवार म्हणाले की, कोर्टाच्या निर्णयावर कशाला भाष्य करायचं? बोलण्यासारखं भरपूर आहे, पण उद्या तुम्हालाही नोटीस येईल आणि मलाही नोटीस येईल. असं मिश्किल उत्तर देताना त्यांना भाजपला टोला लगावला आहे.

    कोल्हापूर : माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज  कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांना हात घालत भाष्य केलं. यावेळी त्यांनी भाजपालाच कसे न्याय मिळाताहेत, किंवा भाजपालाच न्यायालयात जामीन, दिलासा मिळतो हे तुम्हाला सुद्धा माहित आहे, व मला सुद्धा माहित आहे असं म्हटल्यावर एकच हशा पिकला. भाजपाला लोकांना जामीन मंजूर होतोय. मात्र राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख किंवा नवाब मलिक यांना जामीन नाकारण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाईत भाजप महाविकास आघाडीला वरचढ ठरत आहे का? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. यावर पवार म्हणाले की, कोर्टाच्या निर्णयावर कशाला भाष्य करायचं? बोलण्यासारखं भरपूर आहे, पण उद्या तुम्हालाही नोटीस येईल आणि मलाही नोटीस येईल. असं मिश्किल उत्तर देताना त्यांना भाजपला टोला लगावला आहे.

    दरम्यान, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां महाविकास आघाडी सरकार एकत्र लढविणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच कोर्टानं दिलेल्या निकालाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत कोर्टानं दिलेल्या निकालाबाबत अनेक गैरसमज झाले आहेत, असं मला वाटतं. कोर्टानं असं सांगितलंय की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत जिथून तयारी केली आहे, तिथून पुढे तयारी करा, असं मला वाटतं. १५ दिवसांत सुरुवात करा, असं कोर्टाने म्हटलंय असं मला वाटतं. मतदान प्रक्रियेला किमान २ ते अडिच महिने लागतील. असं सुद्धा पवारांनी म्हटले आहे.

    दरम्यान, राजद्रोहाचा कायदा हा ब्रिटिशकालीन १८९०  सालचा आहे. एखाद्या प्रश्नबाबत सरकारच्या विरोधात आवाज उठवण्याचा जनतेचा अधिकार आहे, म्हणून या कायद्याबाबत फेर विचार करण्याबाबत मी बोललो होतो. केंद्र सरकार याबाबत निर्णय घेत असेल तर चांगली गोष्ट आहे. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर त्यासंदर्भात चौकशी करणाऱ्या आयोगानं मला देखील समन्स काढलं होतं. त्यावेळी मला विचारण्यात आलं होतं. तेव्हा मी राजद्रोह या कायद्याबाबत बोललो होतो. असं सुद्धा शरद पवारांनी म्हटलं आहे.