Everything was washed away in the flood, only the clothes remained, Dr. The cry of flood victims in front of Anil Bonde and Ramdas Tadas

नागरीकांनी ‘सर्वच वाहून गेले फक्त आता उरले अंगावरचे कपडे’ असा आक्रोश मंगळवारी (९ ऑगस्ट) पूरग्रस्त भागाला भेट दिलेल्या खासदार डॉ. अनिल बोंडे व खासदार रामदास तडस यांच्याकडे केला. अधिकारी वर्ग पूरग्रस्तांपर्यंत कशाप्रकारे मदत करणार याचे नियोजन करण्याचे आव्हान त्यांच्या समोर उभे ठाकले आहे. एवढेच नव्हे तर पूरग्रस्तांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ही आवश्यक ते प्रयत्न करावे, असे त्यांनी यावेळी आढावा बैठकीत सांगितले.

    वरुड : मागील दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाने कहर केला. यात शहरातील मिरची प्लॉट, खडकपेंड आदी भागातील नागरीकांनी ‘सर्वच वाहुन गेले फक्त आता उरले अंगावरचे कपडे’ असा आक्रोश मंगळवारी (९ ऑगस्ट) पूरग्रस्त भागाला भेट दिलेल्या खासदार डॉ. अनिल बोंडे (MP Dr. Anil Bonde) व खासदार रामदास तडस (MP Ramdas Tadas) यांच्याकडे केला. यातून मार्ग काढण्यासाठी दोन्ही खासदारांनी तहसील कार्यालयात आढावा बैठक (Review meeting at Tehsil office) घेत पूरग्रस्तांना मदत पुरविण्याच्या सूचना वजा इशारा दिला आहे.

    मदतीचे नियोजन

    अधिकारी वर्ग पूरग्रस्तांपर्यंत कशाप्रकारे मदत करणार याचे नियोजन करण्याचे आव्हान त्यांच्या समोर उभे ठाकले आहे. एवढेच नव्हे तर पूरग्रस्तांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ही आवश्यक ते प्रयत्न करावे, असेही यावेळी सांगण्यात आले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोली, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे, मुख्याधिकारी प्रविण मानकर, शेंदुरजना घाटचे मुख्याधिकारी रवींद्र पाटील, बांधकाम विभागाचे अधिकारी, कृषी अधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी या आढावा बैठकीला आवर्जून उपस्थित होते.

     जीवन जगणे झाले कठीण

    दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे होतेचे नव्हते झाले. अख्खे कुटुंब उघड्यावर आले. काहींना न्यू इंग्लीश, काठीवाले सभागृह तर काहींची इतरत्र व्यवस्था करण्यात आली आहे. अगदी लहान सहान मुलांना घेवून हे पूरग्रस्त कुटूंब पोटाची खळगी भरण्यासाठी प्रशासनाने सांगितलेल्या ठिकाणी राहत आहे. परंतु, त्यांच्या आवश्यक त्या गरजा पूर्ण होत नसल्याने बरेचदा काही सामाजिक संघटनांबरोबरच प्रशासनासोबत तू तू मै मै झाली.

     मोफत तपासणी व औषोधोपचार – डॉ. रणधीर घोरपडे

    वरुड येथील पूरग्रस्त लोकांना वैद्यकीय मदत (Medical aid) मिळावी. त्यांची तब्येत चांगली राहावी जेणेकरून कोणत्याही प्रकारची रोगराई वा संसर्गजन्य रोग निर्माण होणार नाही. याकरिता वरुड येथील सुप्रसिद्ध कान, नाक व घसा तज्ञ डॉ. रणजित घोरपडे (Dr. Ranjit Ghorpade) हे ८ तारखेपासून दररोज सकाळी १० ते ११.३० वाजेपर्यंत नागसेन बुद्ध विहार या ठिकाणी वैद्यकीय सेवा देत आहे. औषधे वरुड केमिस्ट अॅड ड्रगीस्ट असोसिएशनचे (Warood Chemists and Druggists Association) मनोज गुल्हाने (Manoj Gulhane) तसेच दिपाली मेडिकल एजंसीचे (Dipali Medical Agency) संचालक राजू भोयर यांनी सुद्धा वेळेवर नि:शुल्क औषध पुरवठा करुन सहकार्य करीत आहे.