माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील पूरग्रस्त नागरिकांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या मदतीचे वाटप

येवला शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून बाधित नागरिकांना तातडीने मदत पोहचविण्यात आली होती. तसेच पूरग्रस्त परिसराची पाहणी करत त्यांना मदत देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानंतर प्रस्तावांची पूर्तता करून शासनामार्फत आज बाधित नागरिकांना मदत देण्यात आली.

येवला : येवला शहरात अतिवृष्टीमुळे (Rain) नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या अतिवृष्टी बाधित कुटुंबीयांना आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते येवला संपर्क कार्यालय येथे २० लाभार्थी कुटुंबीयांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या (Ten thousand) मदतीचे वाटप करण्यात आले. येवला शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून बाधित नागरिकांना तातडीने मदत पोहचविण्यात आली होती. तसेच पूरग्रस्त परिसराची पाहणी करत त्यांना मदत देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानंतर प्रस्तावांची पूर्तता करून शासनामार्फत आज बाधित नागरिकांना मदत देण्यात आली.

अवकाळीच्या फटका नाशिकमध्ये अधिक…

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे. भाजीपाला तसेच द्राक्षं याचं मोठं नुकसान झालंय. काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी रात्री गेले होते. दरम्यान, रात्रीची पाहणी केल्यामुळं त्यांच्यावर टिका करण्यात आली होती. आज शेतकऱ्यांना मदतीच्या वेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुत्केकर, नायब तहसीलदार श्रीमती पंकजा मगर, अभियंता जनार्दन फुलारी, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती संजय बनकर, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, तहसील विभाग व नगरपालिकेचे श्री.सदावर्ते, श्री.भावे, श्री. मिटकरी यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

अवकाळी पाऊस व गारपीटमुळं शेतीचे नुकसान

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे (Rain) ढग घोंगावत आहेत. मागील आठवड्यात महारा‌ष्ट्रातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळं हातातोंडाशी आलेला बळीराजाचा घास पावसाने हिरावून घेतला. अवकाळी पावसामुळे रब्बी पिके धोक्यात आली आहे. काढणीला आलेल्या गहु, हरबरा, मका, तसेच आंबा, फळे आणि पालेभाज्यांना या पावसाचा फटका बसला आहे, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. मागील काही महिन्यांपासून वातावरणातील (environment) बदल व सातत्याने हवामानातील बदल यामुळं कधी पाऊस, (Rain) तर कधी गारपीठ तर कधी अचनाक थंडी (Cold) सुरु आहे, त्यामुळं याचा आरोग्यावर परिणाम होत असून, यामुळं विकाराचे आजार तसेच अन्य आजार हे बळावत चालले आहेत, तसेच राज्यात काही ठिकाणी पाऊव व गारपीठ झाल्यामुळं त्याचा फटका शेती पिकांना बसला आहे.