
बजाजनगर चौकातील एका हॉटेलच्या व्यवस्थापकाने मालकाची दोन लाख रुपयांनी फसवणूक (Fraud in Nagpur) केली. तक्रार मिळताच बजाजनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली. अर्जुन प्रदीप जयस्वाल (वय 31, रा. उज्ज्वलनगर, सोमलवाडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
नागपूर : बजाजनगर चौकातील एका हॉटेलच्या व्यवस्थापकाने मालकाची दोन लाख रुपयांनी फसवणूक (Fraud in Nagpur) केली. तक्रार मिळताच बजाजनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली. अर्जुन प्रदीप जयस्वाल (वय 31, रा. उज्ज्वलनगर, सोमलवाडा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आशिष सुधाकर कोवळे (वय 39, रा. पटेलनगर, काटोल रोड) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला.
आशिषने मित्रासोबत भागीदारीमध्ये बजाजनगर चौकात ‘द कॉमन ग्राऊंड स्पोर्ट्स कॅफे ॲन्ड रेस्टॉरेंट’ उघडले होते. रेस्टॉरेंटचे काम पाहण्यासाठी अर्जुनला व्यवस्थापक म्हणून कामावर ठेवले. मालाची खरेदी आणि पैशांचा व्यवहार त्याच्याकडे सोपविला होता. 2022 मध्ये अचानक अर्जुनचा व्यवहार बदलला. त्याने रेस्टॉरेंटच्या कर्मचाऱ्यांशी वाद सुरू केला. जाब विचारला असता आशिषसोबतही वाद घातला. त्यामुळे ऑक्टोबर 2022 मध्ये त्याला नोकरीतून काढण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी आशिषला समजले की, अर्जुनने रेस्टॉरेंटच्या नावाने बनावट फूड लायसन्स आणि गुमास्ता बनवला आहे. या माध्यमातून त्याने इंडस्इंड बँकेत रेस्टॉरेंटच्या नावाने खाते उघडले.
ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्यांकडून येणारे सर्व ऑर्डरचे पैसे त्याच खात्यात जमा होत होते. अशाप्रकारे जवळपास 2 लाख रुपये त्याने हडपले. आशिषने प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी अर्जुन विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान अर्जुनने अजनी ठाण्यांतर्गत ‘फिरंगीश कॅफे’ उघडले असल्याची पोलिसांनी माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून 1.76 लाख रुपये ही जप्त करण्यात आले.