‘कोणी कुठंही जाऊ द्या, पण मी पक्षाशी एकनिष्ठ’; सेनेच्या माजी आमदाराचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा

गेले चार दिवस सुरू असलेल्या सत्ताचक्रात कोणी कुठेही जाऊ द्या. मी मात्र पक्षाशी एकनिष्ठ असून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नेतृत्व म्हणून काम करणार असल्याचे शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील (Ulhas Patil) यांनी सांगितले.

    जयसिंगपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : गेले चार दिवस सुरू असलेल्या सत्ताचक्रात कोणी कुठेही जाऊ द्या. मी मात्र पक्षाशी एकनिष्ठ असून, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नेतृत्व म्हणून काम करणार असल्याचे शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील (Ulhas Patil) यांनी सांगितले.

    एकनाथ शिंदे यांनी ४२ आमदारांना गुवाहाटीला नेल्याने राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आजी व माजी आमदारांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. परंतु, पक्ष अडचणीत असताना पक्षाबरोबर राहणे गरजेचे आहे. शिवसेनेने मला आमदार होण्याची संधी दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मानून सोबत राहणार असल्याची भूमिका उल्हास पाटील यांनी व्यक्त केली.

    दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील पाच माजी आमदारांनी गोव्याला एकत्रितरित्या ट्रीप केली होती. त्यांच्या या ट्रीपनंतर आता चर्चांना उधाण आले आहे.