पाचगणीच्या सिडनी पाॅईंट परिसरात ५० फूट खोल उत्खनन; स्थानिक प्रशासन ढिम्म

पाचगणीच्या तळमाळ परिसरात पोकलँड मशीनने मोठं उत्खनन झालं असून, या ठिकाणी महसूल व नगरपालिका प्रशासन गांधारीच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतंय.

    पाचगणी : पाचगणीच्या तळमाळ परिसरात पोकलँड मशीनने मोठं उत्खनन झालं असून, या ठिकाणी महसूल व नगरपालिका प्रशासन गांधारीच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतंय. पाचगणीच्या एका 3 स्टार हॉटेलच्या धनिकाने पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसून हजारो ब्रास पोकलॅण्डच्या मशीनद्वारे उत्खनन करत विहिरीसारखा 60 फूट खोल भला मोठा खड्डया काढत त्यातून निघालेले दगड, मुरूम मातीद्वारे प्लॉट निर्मिती करण्याचा उद्योग मांडला आहे.

    कवडीमोल किमतीने जमीन विकत घेत डोंगर पोखरून यापेक्षा या धनिकाने चक्क जमिनीपासून खाली साठ फूट खोल विहिरीप्रमाणे एक खड्डा काढून त्यातील येणारे गौणखनिज यातूनच प्लॉटिंग करण्याचा उद्योग काढला आहे. तहसील कार्यालयाची किरकोळ रॉयल्टी भरून घेतलेली परवानगी या परवानगीच्या नावाखाली हजारो ब्रास उत्खनन करून हजाराची घेतली गेलेली जमीन करोडो करण्याचा उद्योग व घाट घातला गेला आहे. एका धनिकाने पाचगणीत भले मोठे हॉटेल देखील आहे.

    महाबळेश्वर आणि पाचगणी ही दोन्ही थंड हवेची ठिकाणे इकोसंसिटीव्ह झोन म्हणून ओळखली जातात. इथल्या निसर्गाला जतन करुन ठेवण्यासाठी याठिकाणी वेगळी नियमावली आहे. इथल्या नियमांचा भंग केल्यास मोठ्या दंडांची शिक्षा देखील होते. या ठिकाणी घरबांधण्याकरीता किंवा व्यवसायासाठी नियम पाळुन उत्खन्न करण्याची परवानगी आहे, असं असताना मात्र नियमांची पायमल्ली करत नियमांच्या बाहेर जावुन कामं केली जात आहेत. असाच एक प्रकार पाचगणीच्या तळेमाळ या ठिकाणी निदर्शनास आला आहे.