जुगार अड्ड्यावर छापा, पोलिसांनी पैशांसोबतच ‘पत्रे’ ही केले जप्त

शहरात सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई सुरू आहे. अवैध धंदे उघडताच त्यावर कारवाई केली जात आहे. या कारवाईने स्थानिक पोलीस बेजार झाले असून, अवैध धंदेवाल्यांची पळताभुई थोडी झाली आहे. परंतु, त्यानंतरही हे अवैध धंदे बंद होत नसल्याचेही वास्तव आहे. दरम्यान, दसरा चौकातील एका मटन शॉपच्या दुकानाच्या पाठिमागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली.

    – सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईने पोलीस दलात खळबळ

    पुणे, शहरात पोलीस अन् अवैध धंदेवाल्यांमध्ये कारवाईची दहशत निर्माण करणाऱ्या सासुच्या आणखी एका कारवाईने शहरभर चर्चेला उधान आले आहे. चतु:श्रृंगीतल्या दसरा चौकात गुरूवारी सामाजिक सुरक्षा विभागाने जुगारावर कारवाई केली अन् छाप्यात पत्ते, पैशांसोबतच पत्रे देखील जप्त केले. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांसोबतच नागरिकांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे. पोलीसांनी पत्रेही सोडले नाही, अशी गंमतीशीर चर्चा चौका-चौकात रंगू लागल्या आहेत. पोलीसांनी २८ जणांवर कारवाई करत दीड लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

    याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात जुगार मालक कमलेश उर्फ पिनूभाई भगवान ससाणे (रा. बालेवाडी फाटा) याच्यासह २८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर, जुगार खेळविणाऱ्या वसंत रामलिंग शिंदे (वय ३२), रविंद्र धोंडीबा गजधाने (वय ४३), दिपक खंडू म्हात्रे (वय ४२) व महेश निघंना तलवार (वय ३२) यांना अटक केली असून, इतर फरार झाले आहेत.

    शहरात सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई सुरू आहे. अवैध धंदे उघडताच त्यावर कारवाई केली जात आहे. या कारवाईने स्थानिक पोलीस बेजार झाले असून, अवैध धंदेवाल्यांची पळताभुई थोडी झाली आहे. परंतु, त्यानंतरही हे अवैध धंदे बंद होत नसल्याचेही वास्तव आहे. दरम्यान, दसरा चौकातील एका मटन शॉपच्या दुकानाच्या पाठिमागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक आणि त्यांच्या पथकाने याठिकाणी सायंकाळी छापा कारवाई केली. यावेळी येथे खेळण्यास आलेल्यांसोबतच रायटर आणि इतर अशा २८ जणांवर कारवाई करत दीड लाखांचा माल जप्त केला. त्यात ८ हजार ९५० रोकड, १२ मोबाईल, दुचाकी आणि सात पत्रे देखील जप्त केले आहेत. कारवाईनंतर पोलीसांनी शेडचे पत्रेही काढून ते जप्त केल्यानंतर मात्र, परिसरात एकचर्चा सुरू झाली. कारवाईने पोलीस दलात तर खळबळ उडाली आहेच पण पुणेकर चवीने त्याची चर्चा करत आहेत.