Excitement over finding fungal deworming pills in the store, seven students took pills, pills disinfectant or antiseptic?

राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त (National Deworming Day) जिल्हा आरोग्य प्रशासनाच्यावतीने १ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वितरणाची मोहीम सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. तेव्हा अकराव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना गोळ्याचे वितरण सुरु असताना एका स्ट्रिपमध्ये काही गोळ्या बुरशीयुक्त आढळून आल्या. मुख्याध्यापकांनी त्वरित गोळ्याचे वितरण थांबविले.

    भंडारा : भंडाऱ्यात आरोग्य विभागाद्वारे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जंतनाशक गोळ्या या बुरशीयुक्त आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. तर, शिक्षकांचा सतर्कतेने वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे, ह्या गोळ्या जंतुनाशक की जंतुपोषक असा प्रश्न संतप्त पालकांकडून विचारल्या जात आहे. हा सर्व प्रकार लक्षात आल्यामुळे गोळ्या खाणाऱ्या विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तर, त्यांना कुठलीही लक्षणे आढळून न आल्यामुळे सर्वानी सुटकेचा श्वास सोडला आहे. मात्र, गंभीर बाबा अशी की ही घटना केवळ एका स्ट्रिपबाबत घडली नसून, इतरही स्ट्रिप मध्ये अश्या बुरशीयुक्त गोळ्या आढळून आल्या आहेत. नक्की याबाबत योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

    राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त (National Deworming Day) जिल्हा आरोग्य प्रशासनाच्यावतीने १ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या वितरणाची मोहीम सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. भंडारा येथील विकास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, खरबी येथे काल सकाळी ११ वाजता जंतनाशक गोळ्या वितरण करण्यास सुरुवात झाली. या शाळेत आरोग्य विभागाने ४५० गोळ्या वितरणासाठी दिल्या. तेव्हा अकराव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना गोळ्याचे वितरण सुरु असताना एका स्ट्रिपमध्ये काही गोळ्या बुरशीयुक्त आढळून आल्या. मुख्याध्यापकाने (सुधाकर देशमुख ) (Headmaster) त्वरित गोळ्याचे वितरण थांबविले. तर, यांची माहिती तत्काळ आरोग्य विभागाला (Department of Health) देण्यात आली.

    या घटनेची माहिती मिळताच त्वरित तालुका आरोग्य अधिकारी आपल्या चमूसह खरबी येथे दाखल झाले. त्यांनी चौकशी केली असता बॅच नं. एईटी २१६ मध्ये तीन गोळ्या बुरशीयुक्त आढळून आल्या. त्यांनी त्वरित त्या गोळ्या ताब्यात घेतल्या आणि स्ट्रीपमधून ज्या सात विद्यार्थ्यांना गोळ्या खाल्ल्या, त्यांची तपासणी करण्यात आली आहे. आता त्यांच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. अशी माहिती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गणेश हेडाऊ यांनी दिली.