
लयबध्द काळ्या रेषा, निसर्गात दिसणाऱ्या अनेकविध रंगछटांतून अनुराधाताईंनी रेखाटलेला आदिवासींचा आनंद, दैनंदिन जीवन आणि असीम आशावाद यांच्याशी त्यांचे तादात्म्य त्यांच्या चित्रात दिसते त्यांच्या चित्रांतील प्रत्येक भावना भारतातील आदिवासींच्या साध्या दैनंदिन जीवनाचा शोध घेण्याचा, अनुभवण्याचा आनंद आणि निसर्गाच्या सानिध्यातून निर्माण झालेला आशावाद दर्शविते.
मुंबई: चित्रकार अनुराधा ठाकूर (Anuradha Thakur) यांच्या चित्रांचे प्रदर्शन (Exhibition of Pictures) येत्या २१ मार्चपासून २७ मार्चपर्यंत जहांगीर आर्ट गॅलरी (Jehangir Art Gallery) येथे भरणार आहे. या चित्र मालिकेत भारतातील आदिवासी जमातीच्या पारंपारिक संस्कृतीतील सुरेल लयबद्धता त्यांनी चित्रीत केली आहे (She has depicted the melodious rhythms of the traditional culture of tribal tribes in India). अनुराधा ठाकूर त्यांच्या अनोख्या रंगसंगती व विशेषतः काळ्या रंगाच्या वापरासाठी प्रसिध्द आहेत.
झुळझुळत्या झऱ्यांमधले शांत संगीत , पक्षांची किलबिल , हातातल्या बांगड्यांची सुमधुर किणकिण , जंगलात वाहणाऱ्या मंद वाऱ्याचे संगीत , धान्य कांडताना होणाऱ्या मुसळांच्या लयबद्ध हालचाली , वाद्यांचा गजर आणि आदिवासी जीवनाचे स्पंदन हे सर्व त्यांच्या कॅनव्हासवर प्रतिध्वनीत होतात.
लयबध्द काळ्या रेषा, निसर्गात दिसणाऱ्या अनेकविध रंगछटांतून अनुराधाताईंनी रेखाटलेला आदिवासींचा आनंद, दैनंदिन जीवन आणि असीम आशावाद यांच्याशी त्यांचे तादात्म्य त्यांच्या चित्रात दिसते त्यांच्या चित्रांतील प्रत्येक भावना भारतातील आदिवासींच्या साध्या दैनंदिन जीवनाचा शोध घेण्याचा, अनुभवण्याचा आनंद आणि निसर्गाच्या सानिध्यातून निर्माण झालेला आशावाद दर्शविते.
‘एथनिकट्यून्स ‘ हा अनुराधा ठाकूर यांचा भारतभर वसलेल्या विविध आदिवासी समुदायांचे सूक्ष्मातिसूक्ष्म जीवनछटा चित्रित करणारा नवाचित्रसंग्रह. आपल्याला आयुष्यात काय लाभले किंवा काय गमावले या पलीकडे जाऊन आशेच्या किरणांवर जगणाऱ्या अदिवासी जीवनाचे निसर्गाशी असलेले अदृश्य तरीही घट्ट नाते मांडणाऱ्या चित्रांची ही मालिका.
मानवी संयम , चिकाटी आणि सहनशीलतेबद्दलही चित्रे ‘ बोलतात ‘ आणि हाच अढळ विश्वास अनुराधाताईंच्या चित्रनिर्मितीच्या सर्जनशील प्रक्रियेत आशावाद निर्माण करतो आणि समाधानही देतो. आत्मशोध आणि आत्मजागृतीसाठी भारतभर केलेल्या प्रवासात त्यांना हे सारे गुण आदिवासींनीआपल्या दैनंदिन जीवनात सहजपणे सामावून घेतल्याची प्रखर जाणीव झाली.
नापीक जमीन, अपुरापाऊस , दैनंदिन जीवनात आवश्यक छोट्याछोट्या गोष्टींचा अभाव असूनही त्याचा नकारात्मक परिणाम होऊ न देता उलट त्यातून वंशपरंपरागत मिळालेली ‘श्रीमंती’ जपताना पाहून अनुराधाताईंना नवी स्फूर्ती मिळाली. थोडक्यात सांगायचे तर काळ्याभोर सशक्त रेषा आणि विविध रंगांच्या मिश्रणातून आदिवासींच्या रीती , परंपरा आणि समृद्ध संस्कृती यांचे हे साधे सोपे तरीही अत्यंत तरल चित्रण आहे. हे सर्व अनुभवण्यासाठी रसिकांनी वेळ काढून आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी.