लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत, संजय राठोडांना मंत्रीपद मिळणार?

माजी राज्यमंत्री संजय राठोड यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी बंजारा महंतांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून केली आहे. यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून बंजारा समाजाच्या भावना लक्षात घेवून मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान देणार असल्याचा शब्द दिला, अशी माहिती महंत बाबूसिंग महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

    मुंबई : माजी राज्यमंत्री संजय राठोड यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी बंजारा महंतांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून केली आहे. पोहरादवीचे महंत बाबूसिंग महाराज यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांना वन मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. ही घटना दीड वर्षापूर्वीची असून आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो. त्या रिपोर्टमध्ये अपघाती मृत्यू असे मृत्यूचे कारण असून, यात संजय राठोड यांचा काही संबंध नाही. या प्रकरणातून संजय राठोड यांना क्लीनचीट मिळाली असून, त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली.

    दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून बंजारा समाजाच्या भावना लक्षात घेवून मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान देणार असल्याचा शब्द दिला, अशी माहिती महंत बाबूसिंग महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.