
पिंपरी चिंचवड येथील स्पा च्या नावाखाली काही दलाल स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना जास्त पैशाचे अमिषा दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या 'स्पा'वर पोलिसांनी छापा मारला. ही कारवाई अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभाग गुन्हे शाखा यांनी केली असून, दोन मुलींची सुटका केली आहे.
पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील स्पा च्या नावाखाली काही दलाल स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना जास्त पैशाचे अमिषा दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या ‘स्पा’वर पोलिसांनी छापा मारला. ही कारवाई अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्ष विभाग गुन्हे शाखा यांनी केली असून, दोन मुलींची सुटका केली आहे.
वाकड पोलीस स्टेशन हद्दीत राया आयर्वेद स्पा शॉप नंबर 230, 247 दुसरा मजला व्हिजन वन मॉल मुंबई वाकड पुणे येथे अचानक छापा टाकला असता प्रदीप उर्फ जानवी शंकर जाधव (रा.जय मल्हार कॉलनी नंबर 5, काळेवाडी वाकड पुणे), प्रशांत रामचंद्र सोनवणे(रा. चौसाळा जि. बीड), सचिन रतन केदारी (26, रा. वाकड पुणे) यांच्या ताब्यातून दोन मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.
प्रदीप याला ताब्यात घेऊन वाकड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 991/2023 भादवि कलम 370 (3), 34 अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉक्टर संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे, स्वप्ना गोरे, सहा पोलीस आयुक्त गुन्हे सतीश माने यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, विजय कांबळे, पोलिस अंमलदार सुनील शिरसाठ, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली आहे.