मुंबईतून साडेचारशे परदेशी नागरिकांची हकालपट्टी; बेकायदा वास्तव्यामुळे कारवाई

परदेशी नागरिक भारतात आल्यावर तो येथे राहत असलेल्या हॉटेल अथवा ठिकाणाची माहिती देणे बंधनकारक असते. त्यासाठी त्यांना अर्ज क नमुना भरावा लागतो. त्यात त्यांची वैयक्तिक माहिती, सध्याचा पत्ता व संबंधित ठिकाण अथवा व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक द्यावा लागतो. मात्र भारतात बेकायदा राहण्यासाठी अनेक जण अर्ज भरून नोंदणी करत नाहीत. त्यामुळे परदेशी नागरिक विभागीय नोंदणी कार्यालय संबंधित देशाच्या वाणिज्य वकिलातीला अशा नागरिकांची माहिती देते.

    मुंबई – बेकायदा वास्तव्य (Illegal Residence) करणाऱ्या ४५० परदेशी नागरिकांना (Foreign People) देशातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये ४०० पेक्षा अधिक नागरिक आफ्रिका खंडातील (Africa Continent) असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. परदेशी नागरिक विभागीय नोंदणी कार्यालयाने (FRRO) कारवाई केली. भारतातच राहण्यासाठी छोटे-मोठे गुन्हे करून त्याचा खटला निकाली निघेपर्यंत येथेच राहण्याची पळवाट अनेक परदेशी नागरिक शोधतात.

    गेल्या वर्षी देशभरात ७९८ नायजेरिया आणि आफ्रिकी देशातील नागरिकांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. परदेशी नागरिक भारतात आल्यावर तो येथे राहत असलेल्या हॉटेल अथवा ठिकाणाची माहिती देणे बंधनकारक असते. त्यासाठी त्यांना अर्ज क नमुना भरावा लागतो. त्यात त्यांची वैयक्तिक माहिती, सध्याचा पत्ता व संबंधित ठिकाण अथवा व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक द्यावा लागतो. मात्र भारतात बेकायदा राहण्यासाठी अनेक जण अर्ज भरून नोंदणी करत नाहीत. त्यामुळे परदेशी नागरिक विभागीय नोंदणी कार्यालय संबंधित देशाच्या वाणिज्य वकिलातीला अशा नागरिकांची माहिती देते. त्यानंतर नियमभंग करून देशात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना शोधण्यासाठी ‘एफआरआरओ’ विभाग भारतीय गुप्तहेर यंत्रणेच्या (IB) मदतीने विशेष मोहीम राबवते.

    आफ्रिका खंडातील हजारो नागरिक मुंबईसह परिसरात राहतात. त्यात अनेक विद्यार्थी आणि व्यवसायासाठी आलेल्या व्यक्तींचा समावेश असून काही जण बेकायदा राहत आहेत; पण मुंबई आणि परिसरात एकही स्थानबद्ध केंद्र नसल्यामुळे शहरात बेकायदा राहणाऱ्या परदेशी नागरिकांवर नियमित कारवाई होत नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरवर्षी मुंबईसह परिसरात किमान ४०० परदेशी नागरिकांना हद्दपार करण्यात येते.