Expulsion of Chief Minister Shinde! eat Prataprao Jadhav is Shiv Sena's liaison chief again

अखेर दिल्लीहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी पुनश्च खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांची बुलढाणा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करून त्यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व पदांच्या नेमणुकीचे अधिकार दिले आहेत.

    बुलढाणा : जिल्हा शिवेसना संपर्कप्रमुख (Head of District Shiv sena) पदावरून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party chief Uddhav Thackeray) यांच्या आदेशान्वये हकालपट्टी केली होती, अखेर दिल्लीहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी पुनश्च खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांची बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करून त्यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व पदांच्या नेमणुकीचे अधिकार दिले आहेत.

    महाराष्ट्र सदन दिल्ली येथे मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खा. प्रतापराव जाधव यांच्याकडेच बुलडाणा जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख पदी पुनश्च नियुक्ती केली आहे. तसेच, जिल्हयातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार त्यांनाच बहाल केले आहेत. याप्रसंगी खा. प्रतापराव जाधव यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रसंगी सत्कार केला. यावेळी लोकसभेतील गटनेते खा. डॉ. राहुल शेवाळे, खा. हेमंत पाटील, खा. कृपाल तुमाने, खा.धैर्यशिल माने, खा. सदाशिव लोखंडे उपस्थित होते.