mumbai Actress accused of raping director

ज्येष्ठ महिलेच्या मोबाईलवर लोन अॅपची लिंक पाठविल्यानंतर त्यावर माहिती भरताच २ हजार ७०० रुपयांचे लोन दिले. लोनचे पैसे भरल्यानंतर देखील त्यांना खंडणीस्वरूतापत अतिरीक्त पैशांची मागणी करत ५ हजार ७०० रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर मुलीचा अश्लील फोटो तयारकरून तो पाठवून त्यांची बदनामी केली. व्हॉट्सअपद्वारे शिवीगाळ व मॅसेज पाठवून त्यांना त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    पुणे :  ज्येष्ठ महिलेच्या मोबाईलवर लोन अॅपची लिंक पाठविल्यानंतर त्यावर माहिती भरताच २ हजार ७०० रुपयांचे लोन दिले. लोनचे पैसे भरल्यानंतर देखील त्यांना खंडणीस्वरूतापत अतिरीक्त पैशांची मागणी करत ५ हजार ७०० रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर मुलीचा अश्लील फोटो तयारकरून तो पाठवून त्यांची बदनामी केली. व्हॉट्सअपद्वारे शिवीगाळ व मॅसेज पाठवून त्यांना त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    याप्रकरणी ३४ वर्षीय तरूणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून सुपर कॅश लोन अॅपचे मालक तसेच मोबाईल धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १७ जुलै ते १ ऑगस्ट २०२२ दरम्यान घडला आहे. तक्रारदार यांनी याबाबत सायबर पोलीसांकडे तक्रारी अर्ज दिला होता. त्याची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.