Extraordinary charges cannot be increased! Z.P. on increase in educational fees of private schools. President's instructions

यंदा जिल्ह्यातील बहुतांश शाळांना २९ जूनपासून सुरुवात होत आहे. दरम्यान, काही खासगी शाळांनी त्यांच्या शैक्षणिक शुल्कात तब्बल २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. पालकांनी याची तक्रार जि.प. अध्यक्षांकडे केली. त्यामुळे आता खासगी शाळांच्या नियमबाह्य शुल्कवाढीवर शिक्षण विभागाचा चाबूक चालणार आहे.

  गोंदिया : जिल्ह्यातील काही खासगी शाळांनी त्यांच्या शैक्षणिक शुल्कात तब्बल २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ केली. पालकांनी याची तक्रार जिल्हा परिषद अध्यक्षांकडे केली. आता खासगी शाळांचा नियमबाह्य शुल्कवाढीवर शिक्षण विभागाचे चाबूक चालणार आहे. पालकांच्या तक्रारीवर माझे पूर्णपणे लक्ष आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार शाळांचे शुल्क आकारणीचे अहवाल येतील. यात तफावत आढळून आल्यास निश्चितपणे कारवाई केली जाणार असल्याचे जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी सांगितले.

  गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक पालकांचा रोजगार अथवा उत्पन्नाचे स्त्रोत हिरावले गेले. त्यामुळे दोन वर्षे शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यात आली. तर यंदा जिल्ह्यातील बहुतांश शाळांना २९ जूनपासून सुरुवात होत आहे. दरम्यान, काही खासगी शाळांनी त्यांच्या शैक्षणिक शुल्कात तब्बल २० ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. पालकांनी याची तक्रार गोंदियाचे जि.प. अध्यक्षांकडे केली. त्यामुळे आता खासगी शाळांचा नियमबाह्य शुल्कवाढीवर शिक्षण विभागाचे चाबूक चालणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानुसार शाळांचे शुल्क आकारणीचे अहवाल येतील. यात तफावत आढळून आल्यास निश्चितपणे कारवाई केली जाणार आहे. खासगी शाळांना नियमबाह्य शुल्कवाढ करता येणार नाही, असे निर्देश जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

  शैक्षणिक फी वाढीविरोधात पालकांच्या तक्रारी

  कोरोनामुळे दोन वर्षे ऑनलाइन शिक्षणात गेले. शाळेत जाण्याची आतुरता विद्यार्थ्यांना आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ते २०२१-२२ या काळात कोरोना महामारीमुळे शाळा-महाविद्यालये बंद होती. त्यावर उपाय म्हणून शैक्षणिक संस्थांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे अनेक पालकांचा रोजगार हिरावला. काहींचे उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित झाले. त्यामुळे शासनाच्या आदेशान्वये शाळांनी शैक्षणिक शुल्कात काही प्रमाणात सवलत दिली होती. गेल्या दोन वर्षांत सवलत देऊन शैक्षणिक शुल्क घेतल्यानंतर आता शैक्षणिक संस्थांनी पुन्हा शुल्कवाढ केली आहे. या संदर्भात पालकांनी जि.प. अध्यक्ष रहांगडाले यांच्याकडे तक्रार केली आहे.

  १५ टक्के फी वाढीचे अधिकार

  जि.प. अध्यक्ष रहांगडाले यांनी पालकांची तक्रार निवारण करण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले. शिक्षणाधिकाऱ्यांनी दोन वर्षांच्या अंतरावर १५ टक्के फी वाढ करण्याचे नियम असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील शाळांनी अशाप्रकारे नियमबाह्य २५ ते ३० टक्के शुल्कवाढ केली असल्यास त्यांचे मागील पाच वर्षांचे शुल्कवाढीची आकडेवारी मागवून त्यातील शहानिशा केली जाईल. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार.

  शेख कदम, शिक्षणाधिकारी