‘फडणवीस-अजित पवारांचा शपथविधी ही शरद पवारांची चाल…’ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं खळबळजनक विधान, शिवसेनेला म्हणाले…

फडणवीस आणि अ्जित पवारांचा तो शपथविधी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची खेळी असू शकते, असं वक्तव्य करुन जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात नवा बॉम्ब फोडला आहे. त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ती उठवण्यासाठी शरद पवारांची ही चाल असू शकते असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय.

    मुंबई– राज्याच्या राजकारणातील अत्यंत खळबळजनक बातमी ठरलेल्या 23 नोव्हेंबर 2019 च्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit pawar( यांच्या पहाटेच्या थपशविधीबाबत राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. फडणवीस आणि अजित पवारांचा तो शपथविधी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची खेळी असू शकते, असं वक्तव्य करुन जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात नवा बॉम्ब फोडला आहे. त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ती उठवण्यासाठी शरद पवारांची ही चाल असू शकते असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलंय. गेल्या 3 वर्षांपासून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा झालेला शपथविधी यावरुन अनेकदा चर्चा रंगलेल्या आहेत.

    नेमकं काय म्हणालेत जंयत पाटील ?

    एबीपी माझाशी बोलताना जयंत पाटील म्हणालेत की,’ मला वाटत नाही अजित पवार काही म्हणाले असतील. 2019 साली विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट होती. ही राजवट उठवण्याशिवाय काही पर्याय नव्हता.त्या अनुषंगाने केलेली ही खेळी असू शकते. त्यामुळं त्यापेक्षा जास्त याला काही महत्त्व आहे, असं मला वाटत नाही. त्यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला आज महत्त्व नाही. त्यानंतर अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या काळात त्यांनी स्पष्ट कारभार पाहिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही. आता शिवसेनेचे आमदार कोसळल्यानं सरकार कोसळले. पण राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरेंना शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली. हे नाकारता येणार नाही’ शरद पवार आणि भाजपात साटंलोटं असल्याच्या आरोपांना उत्तर देताना जयंत पाटील यांनी हे खळबळजनक विधान केलेलं आहे.

    राष्ट्रवादीचा उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम

    वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती झाल्यानंतर मविआत वाद निर्माण झाल्याची स्थिती आहे. शरद पवार हे अप्रत्यक्षपणे भाजपासोबत आहेत आणि त्यांच्या इशाऱ्यावर काम करतात, असा प्रकाश आंबेडकरांचा आरोप आहे. आता मविआत आंबेडकरांना सामावून घेणार का, यावरुनही वाद आहेत. अशात राष्ट्रवादीनं ठाकरे गटाला मविआबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा अल्टिमेटम दिल्याचं मानण्यात येतंय. ठाकरे गटानं सार्वजनिक पातळीवर भूमिका स्पष्ट करण्याची गरज व्यक्त होते आहे. पदवीधर निवडणुकांतही मविआतील गोंधळ समोर आलेलाच होता. आता महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीच्या भूमिकरा स्पष्ट होण्याची गरज व्यक्त होतेय.