घटनाबाह्य सरकार चालवताना फडणवीस, पवार यांची दमछाक होते, जनतेचा सरकारवर प्रचंड रोष, संजय राऊतांची टीका

उपोषण सोडविण्यात किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात या सरकारला अपयश आले आहे. तसेच जनतेच्या रेट्यामुळं मुख्यमंत्र्यांना जालन्यात जावे लागत आहे. अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलाी.

    मुंबई – रोजच्याप्रमाणे आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधताना, यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टिका केली. मराठा आरक्षणासाठी मागील १७ दिवसांपासून जालन्यात उपोषण, आदोलन सुरु आहे, पण हे सरकार जरांगे-पाटलांना गुंडाळण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांचे उपोषण सोडविण्यात किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात या सरकारला अपयश आले आहे. तसेच जनतेच्या रेट्यामुळं मुख्यमंत्र्यांना जालन्यात जावे लागत आहे. अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलाी. (Fadnavis, Pawar were exhausted while running the government outside the constitution, people are very angry with the government, Sanjay Raut’s criticism)

    निर्णय सहा महिन्यांपूर्वीच द्यायला हवा होता

    पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय लवकर देणे अपेक्षित होते. वर्षभर कोर्टात सुनावणी सुरु होती. यानंतर काही महिन्यांपूर्वी कोर्टान विधानसभा अध्यक्षाकडे हे प्रकरण सुपूर्द केले. मात्र विधानसभा अध्यक्ष चालढकल करताहेत तसेच वेळकाढूपणा करताहेत. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सहा महिन्यांपूर्वीच द्यायला हवा होता. सध्या राज्यात घटनाबाह्य सरकार आहे, असे शिवसेना ठाकरे गटावर खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

    नार्वेकर यांनी घटनेशी द्रोह केला

    दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कायदेतज्ज्ञ आहेत, त्यांना कायद्याची चांगली जाण आहे. त्यांना पक्ष बदलण्याचा देखील बरा अनुभव आहे. त्यामुळं ते योग्य तो निर्णय घेतली. असं राऊत म्हणाले. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घटनेशी द्रोह केला, अशी घणाघाती टिका संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर केली.