Power should not go to the head; Devendra Fadnavis warns Mahavikas Aghadi government on Kangana and Arnab issue

राज्यातील मविआचे सरकार (MVA) कोसळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळं विरोधक आक्रमक झाले असून, विरोधकांनी सुद्धा रणनिती आखयला सुरुवात केली आहे. याचच एक भाग म्हणून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन, रत्ना गुट्टे, जयकुमार रावल, कालीदास कोळंबकर आदी नेत्यांच्या  उपस्थित बैठक सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. (devendra fadnvis, pravin darekar, ashish shelar, girish mahajan, kalidas kolambkar) दरम्यान, माजी खासदार उद्यनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

    मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत (MLC Election 2022) मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली असून, मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतनंतर (Surat) आता जवळपास 48 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. त्यानंतर राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला असून, मविआमध्ये बैठकाचं (MVA meeting) सत्र सुरु आहे. आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, शिवसेना नेते अनिल देसाई आणि संजय राऊत यांची एक बैठक पार पडली. (MVA Meeting Sharad pawar, dilip walse patil, anil desai, sanjay raut) त्याआधी शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जिल्हासंपर्कप्रमुखांची बैठक घेतली. त्यानंतर आता विरोधक सुद्धा आक्रमक झाले असून, विरोधकांनी सुद्धा रणनिती आखयला सुरुवात केली आहे.

    दरम्यान, राज्यातील मविआचे सरकार (MVA) कोसळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळं विरोधक आक्रमक झाले असून, विरोधकांनी सुद्धा रणनिती आखयला सुरुवात केली आहे. याचच एक भाग म्हणून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन, रत्ना गुट्टे, जयकुमार रावल, कालीदास कोळंबकर आदी नेत्यांच्या  उपस्थित बैठक सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. (devendra fadnvis, pravin darekar, ashish shelar, girish mahajan, kalidas kolambkar) दरम्यान, माजी खासदार उद्यनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. शिंदे गटाचा भाजपला पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे, तशा एक व्हीडिओ एकनाथ शिंदेंचा समोर आला आहे, त्यामुळं भाजपाने सुद्धा आता रणनिती आखयला सुरुवात केली आहे.

    गुहावटीतील आमदारांना मुंबईत कसे आणायचे किंवा त्यांच्याशी चर्चा कशी करायची, सर्व बंडखोर आमदारांना मुंबईत आणायचे कि अन्य ठिकाणी हलवायचे आदी गोष्टीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सागर बंगल्यावरील देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बैठकीत काय खलवतं होतं हे पाहावे लागेल.