फडणवीस गोव्यात गेले अन् भाजप पक्ष फुटला: महाविकास आघाडीच्या ‘या’ बड्या नेत्याची टीका

फडणवीस यांनी शिवसेनेच्या डिपॉझिटची काळजी करण्यापेक्षा प्रथम पक्षातंर्गत युद्ध लढावे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून गोव्यात गेले. ते तिथे गेल्यानंतर आपण पाहिलंच असेल की, भारतीय जनता पक्षही फुटला. काल एका मंत्र्यांनी पक्षाचा त्याग केला. भाजप आमदार प्रवीण झांटये यांनी देखील पक्ष सोडला. त्यामुळे त्यांनी आधी पक्षांतर्गत युद्धाकडे लक्ष द्यावे.

    मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीचे भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दात टिका केली आहे. देवेंद्र फडणवीस गोव्यात गेल्यानेच भाजप पक्ष फुटला, अशी टिप्पणी खा राऊत  यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.

    आमची लढाई गोव्यात नोटांशीच

    फडणवीस यांनी शिवसेनेच्या डिपॉझिटची काळजी करण्यापेक्षा प्रथम पक्षातंर्गत युद्ध लढावे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातून गोव्यात गेले. ते तिथे गेल्यानंतर आपण पाहिलंच असेल की, भारतीय जनता पक्षही फुटला. काल एका मंत्र्यांनी पक्षाचा त्याग केला. भाजप आमदार प्रवीण झांटये यांनी देखील पक्ष सोडला. त्यामुळे त्यांनी आधी पक्षांतर्गत युद्धाकडे लक्ष द्यावे. भाजपचे आमदार प्रश्न नोटांचा म्हणत आहेत ते अगदी बरोबर आहे. आमची लढाई गोव्यात नोटांशीच आहे. भाजपची लोकं ज्याप्रकारे निवडणूकीत नोटांचा पाऊस पाडत आहेत. विशेषतः महाराष्ट्रातून ज्या काही नोटांच्या बॅगा चाललेल्या आहेत. शिवसेना गोव्यातील जनतेला हे सांगण्याचा प्रयत्न करेल, या नोटांच्या दबावाखाली येऊ नका. शिवसेना हा सामान्यांचा, बहुजनांचा पक्ष आहे. हिंदुत्ववादी हा या नोटांना पुरुन उरेल हे नक्की. देवेंद्र फडणवीसांना माझा शब्द आहे, तुम्ही कितीही नोटा टाका, तुमच्या नोटांशी आम्ही लढू, असे संजय राऊत यांनी म्हटले.

    सत्तेत येणाऱ्या पक्षाला गळती लागत नाही

    उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता येणार, असे निष्कर्ष काही मतदानपूर्व चाचण्यांमध्ये समोर आले आहेत. भाजपला तसे वाटत असेल वाटू दे. पण सत्तेत येणाऱ्या पक्षाला कधीच गळती लागत नाही. त्या पक्षाचे आमदार, मंत्री किंवा प्रमुख कार्यकर्ते पक्ष सोडून जात नाहीत. उत्तर प्रदेशचा प्रवास हा परिवर्तनाच्या दिशेने सुरु आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.