Hathras communal riot conspiracy ED reveals 50 crore sent from Mauritius

ठाण्यातून (Thane News) तब्बल ८ कोटींच्या बनावट नोटा जप्त (Fake Notes Seized) करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पालघरमधील (Palghar News) दोघांना अटक करण्यात आली आहे.

    ठाणे: बनावट नोटांसंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्यातून (Thane News) तब्बल ८ कोटींच्या बनावट नोटा जप्त (Fake Notes Seized) करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पालघरमधील (Palghar News) दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मास्टर माईंड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.  त्याचा शोध सुरु आहे. ठाणे गुन्हे शाखेनं (Thane Crime Branch) यासंदर्भातील कारवाई केली आहे.

    ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट नं ५ (Thane Crime Branch Unit 5) पालघरमधील दोघांना अटक करुन तब्बल ८ कोटींच्या बनावट भारतीय नोटा जप्त केल्या आहेत. दोन्ही आरोपी या सर्व बनावट नोटा बाजारात चलनात आणणार होते. सर्व नोटा दोन हजारांच्या आहेत. या प्रकरणी पालघरमधील दोघांना अटक करण्यात आली आहे. राम शिंदे आणि राजेंद्र राऊत अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं असून दोघंही पालघरमधील राहणारे आहेत.

    पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली होती. त्याच माहितीच्याआधारे पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी दोन्ही आरोपींकडे २,०० रुपयांच्या बनावट भारतीय नोटा असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी आरोपींकडून ४००  बंडल जप्त केले आहेत. यासर्व नोटा आरोपी चलनात आणणार असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांचं पथक बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचाही शोध घेत आहे. यामागे मोठं रॅकेट असल्याचा संशय पोलिसांना आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींची पोलिसांकडून अधिक चौकशी सुरु आहे. दोघांच्या चौकशीमधून आणखी माहिती मिळण्याची शक्यता असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणामुळे मोठं रॅकेटही उघडकीस येण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.