पॅराशूट कंपनीच्या नावाने बनावट तेलविक्री; दुकानदारावर गुन्हा दाखल

पिंपरीतील मेन बाजारात असलेल्या महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानात दुकानदाराने पॅराशूट कंपनीच्या तेलाच्या नावाने बनावट तेलाची विक्री केली. याप्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पिंपरी : पिंपरीतील मेन बाजारात असलेल्या महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानात दुकानदाराने पॅराशूट कंपनीच्या तेलाच्या नावाने बनावट तेलाची विक्री केली. याप्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 30) दुपारी करण्यात आली.

    छीवाराम लादूराम चौधरी (33, रा. चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी निखील दिनकर पाटील (32, रा. कोल्हापूर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौधरी याने त्याच्या दुकानात पॅराशूट कंपनीच्या नावाने बनावट तेलाची विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दुकानावर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 14 हजार 590 रुपये किमतीच्या 238 बनावट तेलाच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.