अख्खं कुटुंबच फोर व्हिलर गाड्यांची करायचं चोरी; दोन मुले आणि बापासह पाच जणांना अटक

  जालना : फोर व्हिलर गाड्या चोरणारे अख्खं कुटुंब जालना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. जालना शहरातील सदर बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक स्वीफ्ट डिझायर कार चोरीला गेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. त्याचा तपास करण्याच्या अनुषंगाने खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातल्या चोरट्यांनी चोरली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

  अख्खं कुटुंबच चोरीत सहभागी

  त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने पथकाची नेमणूक करून बुलढाणा जिल्ह्यातील धाड करडी याठिकाणी पोलिसांनी छापा टाकला. यात चोरी गेलेली कार त्याठिकाणी आढळून आली. त्यानंतर अख्खं कुटुंबच एका सेन्सॉर कीटच्या साहाय्याने गाडी चोरी करीत असल्याचे उघडकीस आले.

  सेन्सॉर डिव्हाईस कीटच्या चोरी

  शेख दाऊद उर्फ बब्बू शेख मंजूर (56वय), शेख अफजल ऊर्फ गोलू शेख दाऊद (22वय), शेख राजा शेख दाऊद (24 वय) शेख फरदीन शेख युसूफ (24 वय,), अरबाज शेख दाऊद असे या आरोपींची नावे आहेत. एका ओबीडी स्टार नावाच्या एका सेन्सॉर डिव्हाईस कीटच्या सहाय्याने हे कुटुंब फोर व्हिलर गाड्या चोरत असल्याचे उघडकीस झाले आहे.

  9 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

  हे किट त्यांनी 20 हजार रुपयांत ऑनलाईन खरेदी केली होते. या प्रकरणात चोरीला गेलेल्या कार आणि गुन्ह्यात वापरलेली एका चारचाकी कारसह एकूण 9 लाख 80 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, त्यांनी आणखी किती गाड्या चोरल्या असल्याचा तपास पोलीस करीत आहेत.