कल्याण येथील प्रसिद्ध गिर्यारोहक प्रशिल अंबादे याने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर फडकवला तिरंगा

एव्हरेस्ट बेस कॅम्प गिर्यारोहण पूर्ण करताच प्रशिलने कल्याण डोंबिवली आणि नजीकच्या परिसरातून एव्हरेस्ट बेस कॅम्प गिर्यारोहण पूर्ण करण्याचा मान मिळवला.

    कल्याण : कल्याण येथे राहणारा प्रसिद्ध गिर्यारोहक प्रशिल अंबादे यांनी 13 दिवसापर्यंत चाललेल्या भारत नेपाळ मोहिमेअंतर्गत एवरेस्ट बेस्ट कॅम्पवर तिरंगा फडकवला. या मोहिमेमध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्य महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक आणि दिल्ली येथील आठ गिर्यारोहकांनी सहभाग नोंदवला होता.

    प्रशिलने या मोहिमे अंतर्गत जगातील सर्वात उंच शिखर माउंट एवरेस्टच्या बेस कॅम्प ज्याची समुद्रसपाटीपासून उंची 17 हजार 598 फूट आहे. या जागेवर पोहोचून तिरंगा फडकवला. प्रशिलने सांगितले की, तेरा दिवस चाललेल्या या मोहिमेमध्ये कमी वायुदाब, कमी ऑक्सिजन, लांबवर पसरलेले रस्ते अन उपलब्ध पाणी अशा अनेक कठीण परिस्थितीला पार करत समोर जावे लागले.

    प्रशिलने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचून लोकांना पृथ्वीवर वाढत्या तापमानाकारण ग्लेशर वितळून होणाऱ्या नुकसानाबद्दल माहिती दिली. लोकांना स्वच्छतेचा संदेश तसेच जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी विनंती केली, जेणेकरून येणाऱ्या काळात वाढत्या तापमानामुळे आणि वितळणाऱ्या ग्लेशरला आपण वाचवू शकू.

    या मोहिमेदरम्यान प्रशिलने वृक्षतोडीकरण जागतिक तापमान वाढ होऊन पृथ्वीवर होणारे दुष्परिणाम यांबाबत चिंता व्यक्त केली. तसेच वाढत्या तापमानाला कमी करण्यासाठी वृक्षारोपण हा एकमेव मार्ग असेही सांगितले. एव्हरेस्ट बेस कॅम्प गिर्यारोहण पूर्ण करताच प्रशिलने कल्याण डोंबिवली आणि नजीकच्या परिसरातून एव्हरेस्ट बेस कॅम्प गिर्यारोहण पूर्ण करण्याचा मान मिळवला.