सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक

पंढरपूर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्यानं काही दिवसापूर्वी कर्जाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेनं पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    पंढपूर : पंढरपूर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्यानं काही दिवसापूर्वी कर्जाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेनं पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून पंढरपूर जवळच्या वाखरी येथील शेतकऱ्यानं विष पिऊन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. परमेश्वर पोरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. सदर शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    नेमकं काय घडलंय? 

    पंढरपूर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकरी परमेश्वरी पोरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर प्रकरणात सावकारानं शेतकऱ्याचं परस्पर शेत विकलं होतं. त्यामुळे शेतकरी परमेश्वर पोरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने पंढरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सदर शेतकऱ्याचा आत्महत्या करत असल्याचा लाईव व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे.

    दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्यांच्यावर पंढरपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची नोंद पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.