Why did my marriage take place in a poor house? Considering such a question, the reason for the suicide of a depressed girl became clear

आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहीली होती. मोदी सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव न दिल्याची खंत त्यांनी या चिठ्ठीतून व्यक्त केली होती.

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi)चा नुकताचं वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्त्या ( Farmers Suicide) केल्यीची घटना उघडकीस आहे. दशरथ लक्ष्मण केदारी असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. पंतप्रधाना शुभेच्छा देण्यासोबत पिकांना हमीभाव न देण्यात आल्याची खंतही शेतकऱ्याने व्यक्त केली.

    पुण्याच्या जुन्नर तालुक्यात वडगाव आनंद येथील शेतकरी दशरथ केदारी त्यांच्या मालकीची एक एकर शेती होती. या शेतीवर त्यांचा उदर्निवाह अवलंबून होता. त्यांनी कर्ज घेऊन शेतात कांदा, टोमॅाटो, सोयाबीनची लागवड केली होती. पण पहिल्या पावसात टोमॅटो खराब झाला, तर काही दिवसापासून येत असलेल्या पावसामुळे सोयाबीनचे पीकही खराब झाले त्यामुळे ते पुरते हताश झाले होते. तर, दोन दिवसापुर्वी ते तलाठी कार्यालयात गेले. दोन तास तिथं बसून सोयबिनच्या पंचनाम्याची करणयाची मागणी केली दरम्यान, कर्ज फेडण्याच्या विंवचनेत असताना त्यांनी दुपारच्या सुमारास आधी विष प्राशन केलं अन मग शेतातील तळ्यात उडी घेत आपलं जीवन संपवल.

    आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहीली होती. मोदी सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव न दिल्याची खंत त्यांनी या चिठ्ठीतून व्यक्त केली होती. कांदा-टोमॅटोचे ढासळणारे दर, कोरोना-अतिवृष्टीचं संकट आणि फायनान्स कंपन्या आणि पतपेढीवाले हफ्ता भरण्यासाठीचा ससेमिरा यामुळं पुरता बेजार झाल्याचं ही चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.