शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

शिक्रापूर : करंदी (ता.शिरुर) येथे शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याचा शेतात पिकांना पाणी देत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून, शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    करंदी (ता.शिरुर) येथे चऱ्होली येथील हिरामण ताम्हाणे व दत्तात्रय ताम्हाणे यांनी शेती घेतेलेली असून, त्यांनी शेतात फुलांची शेती केली आहे. १२ मे रोजी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी हिरामण ताम्हाणे व दत्तात्रय ताम्हाणे हे दोघे आले होते. यावेळी शेतातील दुसऱ्या बाजूला पाणी पोहोचले की नाही हे सांगण्यासाठी गेलेले दत्तात्रय ताम्हाणे यांचा आवाजच येत नसल्याने हिरामण यांनी दुसऱ्या बाजूला जाऊन पाहिले असता ते तेथेच पडल्याचे दिसून आले.

    त्यांना आवाज देऊन देखील दत्तात्रय प्रतिसाद देत नसल्याने हिरामण यांनी त्यांना शिक्रापूर येथील खाजगी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी दत्तात्रय लक्ष्मण ताम्हाणे (वय ४८ वर्षे रा. चऱ्होली ता. हवेली जि. पुणे) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले.

    याबाबत हिरामण पोपट ताम्हाणे (वय ४० वर्षे रा. चऱ्होली ता. हवेली जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.