संतप्त शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्याना दिला महाराष्ट्राचे महादगलबाज पुरस्कार!

याच्या बळावर चांगले दिवस आले त्यालाच वाऱ्यावर सोडले जाते. सद्या पेरणीयोग्य पाऊस नाही शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. अश्या वेळी त्या त्या भागातील आमदारांनी हे गाऱ्याणे शासन दरबारी मांडले तर त्याकडे लक्ष वेधले जाऊ शकते. मात्र त्यांचे त्याकडे लक्ष नाही. अशी टिका यावेळी शेतकऱ्यांनी केली.

    बुलडाणा : सध्या पेरणीचे दिवस आहे, राज्यात सार्वत्रिक पावसाचा अभाव आहे, अनेक जिल्ह्यात पेरण्या बाकी आहे तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.त्यातच बळीराजाला रास्त दरात खत देखील मिळेनासे झाले आहे. व्यापारी ऐका खता सोबत दुसरी खताची बॅग घ्यायला भाग पाडत आहे. असे असताना राज्याचे कृषिमंत्री राज्यात नाहीत. त्या सोबत लोकप्रतिनिधी म्हणवणारे आमदार मात्र गुवाहाटीमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये मौज करीत आहे. त्यांनी जसा स्वताच्या पक्षाशी द्रोह केला त्यापेक्ष्या अधिक बळीराज्याशी केला आहे. संकटकाळी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याची ही कृती दगलबाजी असल्याने कृषक समाज कार्यकर्त्यांनी या कृतीचा निषेध करीत कृषिमंत्री भुसेसह त्या बंडखोर आमदारांना महाराष्ट्राचे “महादगलबाज” पुरस्कार दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तो आज सुपूर्त करण्यात आला.

    इडा पीडा जावो बळीराज्य येवो असा आशावाद शेतकरी बाळगतो. पण त्याला पाताळात गाडण्याचे काम होत आले आहे. राजवट कोणतीही असो राज्यकर्ते केवळ आपल्या तुंबड्या भरीत आहे. ज्याच्या बळावर चांगले दिवस आले त्यालाच वाऱ्यावर सोडले जाते. सद्या पेरणीयोग्य पाऊस नाही शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. अश्या वेळी त्या त्या भागातील आमदारांनी हे गाऱ्याणे शासन दरबारी मांडले तर त्याकडे लक्ष वेधले जाऊ शकते. मात्र त्यांचे त्याकडे लक्ष नाही. सत्ता स्थापनेची साठमारी सुरू आहे. एकनाथ शिंदे यांचे सह 40 आमदार गेल्या काही दिवसांपासून जनतेला वाऱ्यावर सोडून मजा करीत आहे. हा केवळ पक्ष्याशी द्रोह नाही तर जनतेशी सुद्धा द्रोह आहे. मनात येईल तसे वर्तन सुरू आहे. महाराष्ट्र कृषक समाज मंडळाने याचा निषेध नोंदवला असून या बेजबाबदार 40 आमदारांना महाराष्ट्राचे महा दगलबाज पुरस्कार 2022 दिला आहे. हा पुरस्कार जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे मार्फत राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.