रिलायन्स गॅस पाईपलाईनविरोधात शेतकरी पुन्हा आक्रमक

    कर्जत : तालुक्यातून रिलायन्स गॅस पाईपलाईन (Reliance Gas Pipeline) जात आहे. यामुळे बाधित शेतकऱ्यांना (Interrupted Farmers) अद्याप मोबदला देण्यात आला नाही. दरम्यान, आपल्याला बाधित जमिनीचा मोबदला (Compensation) मिळावा यासाठी कर्जत तालुक्यातील मोबदला न मिळालेल्या ५१ शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका (Aggressive Role) घेतली आहे.

    रिलायन्स इथेन गॅस पाईपलाईन प्रकल्पबाधीत शेतकरी गेल्या २०१८ पासून कंपनी, सक्षम अधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि शासकीय स्तरावर विविध मार्गांनी आपल्या न्याय हक्कासाठी पाठपुरावा करत आहेत. अनेकवेळा पत्रव्यवहार, बैठका, आंदोलने आणि उपोषण करूनही आजपर्यंत कंपनीने ठरलेला मोबदला दिलेला नाही. फक्त आश्वासने आणि वेळ काढूपणाची भूमिका घेत हा विषय प्रलंबित ठेवून शेतकऱ्यांची फसवणूक (Cheating) केली आहे.

    आता सर्व ५१ शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला असून वेळा पत्रव्यवहार, बैठका, आंदोलने आणि उपोषण करूनही आजपर्यंत कंपनीने ठरलेला मोबदला दिलेला नाही. फक्त आश्वासने आणि वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील अवसरे, बिरदोले, कोदिवले, वंजारपाडा, तळवडे, पिंपळोली, वाकस, नसरापूर, गणेगाव, कडाव, कर्जत यासह ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी उपोषण केले आहे.

    रिलायन्स आणि दलालांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून प्रकल्पाचे काम पूर्ण केले आणि मग मोबदला देण्याबाबत टाळाटाळ सुरू आहे. अनेक वेळा बैठका झाल्या; परंतु निर्णयशून्य अशी स्थिती असताना, शेतकऱ्यांनी अजून किती दिवस वाट पाहायची? एकीकडे या प्रकल्पामुळे पीक घेता आले नाही, तर दुसरीकडे निसर्गानेही शेतकऱ्यांकडे पाठ फिरवत पिकांचे नुकसान केले. अशा स्थितीत दीनदुबळ्या शेतकऱ्यांनी आपला उदरनिर्वाह तरी कसा करायचा, हा प्रश्न भेडसावत आहे. खोटे पंचनामे, पेमेंट स्थगिती, पोलिसी बळाचा वापर करून जबरदस्ती पाईपलाईन टाकण्याचे काम रिलायन्सने केले आहे. या सर्वांचा उद्रेक आता झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.