शेतकऱ्यांना पावसाची अद्याप प्रतिक्षाच; पेरण्या खोळंबल्या

मृग नक्षत्राला संपून आठवड्यापेक्षा अधिक काळ उलटला. मात्र, तासगाव तालुक्यात पाऊस पडला नसल्याने याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला असून, पेरण्‍या खोळंबल्या आहेत. त्‍यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली (Farmers in Tension) आहे.

    तासगाव / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मृग नक्षत्राला संपून आठवड्यापेक्षा अधिक काळ उलटला. मात्र, तासगाव तालुक्यात पाऊस पडला नसल्याने याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला असून, पेरण्‍या खोळंबल्या आहेत. त्‍यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली (Farmers in Tension) आहे. १० हजार हेक्टर द्राक्षशेती बागायती पीक असलेल्या तासगाव तालुक्यात ३५ हजार हेक्टरवर हंगामी शेती केली जाते. ही शेती मान्सूनवर अवलंबून असून, मान्सून लांबल्याने आता या पेरण्‍या खोळंबल्या आहेत.

    मान्सून लांबणीवर पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्‍याने शेतकऱ्यांनीही खत-बियाणे खरेदीबाबत दिरंगाईची भूमिका ठेवली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, जून महिना संपत आलातरी समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत असल्याचे दिसून येत आहे. पेरणी लांबल्याने शेतकऱ्यांचे पूर्ण गणितच बिघडलेले आहे. दरम्यान, पेरणीयोग्य पाऊस केव्हा होईल, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

    पेरणीसाठी जमिनीची पूर्वमशागत करून ठेवली आहे. अजून पाऊस झाला नसल्याने चिंता वाढत आहे. संततधार पाऊस कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

    – यशवंत पोळ, शेतकरी, सावळज.