विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी शेतकरी संघटनेचे महावितरणला निवेदन

सध्या शेतकऱ्यांनी गव्हाची आणि हरभरा पीकाची पेरणी केली आहे.मागील काही महिन्यात परतीच्या पावसाने शेकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते, त्यामुळे या काळात पाण्याची जास्त आवश्यकता जाणवली नाही. महावितरणकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्युत पुरवठा खंडित केला आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

    यवत – दौंड तालुक्याच्या पश्चिम भागात महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्युत पुरवठा खंडित केल्याने तो ताबडतोब सुरु करण्यात यावा, याबाबत शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या शाखा अभियंता यांना निवेदन देण्यात आले.

    दौंड तालुक्यातील पश्चिम भागातील यवत,पिंपळगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता शेतकऱ्यांचा कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि मोठा असंतोष निर्माण झाला होता.मागील दोन दिवसापूर्वी यवत येथील शेतकऱ्यांनी देखील हवेलीमधील गावांना यवत येथून होणारा विद्युत पुरवठा देखील ८ तास खंडित केला होता. आम्हाला तुमची वीज नसेल, तर आमच्या शेतात तुमच्या विजेचे खांब देखील नको ! असा पवित्रा येथील शेतकऱ्यांनी घेतला होता.

    सध्या शेतकऱ्यांनी गव्हाची आणि हरभरा पीकाची पेरणी केली आहे.मागील काही महिन्यात परतीच्या पावसाने शेकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते, त्यामुळे या काळात पाण्याची जास्त आवश्यकता जाणवली नाही. महावितरणकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्युत पुरवठा खंडित केला आहे, त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. काही शेतकऱ्यांनी वीजबिल भरले असताना, देखील त्यांचा विद्युतपुरवठा खंडित केला आहे.त्यामुळे शेतकरी वर्गात देखील मोठी नाराजीची लाट पसरली आहे.

    महावितरणने योग्य तो निर्णय न झाल्यास पुढील दोन दिवसात तीव्र आंदोलन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येईल, असा इशारा या या निवेदना द्वारे देण्यात आला आहे.

    या वेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील नातु,तालुका कार्याध्यक्ष महेश थोरात,राजेंद्र शिंदे,राम गाडेकर,राजेद्र दिवेकर , नितीन जावळे,विष्णूभाऊ जगताप, नितीन जगताप, मच्छिंद्र शिंदे, ब्रम्हानंद मापारे,महेश शिंदे,अनिल फरगडे हरी विश्वासे,दिपक कापरे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.