मान्सूनपूर्व मशागत करण्यात शेतकरी मग्न, बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे कल

येणाऱ्या पावसाळ्यात चोपडा तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे कल दिसून येत आहे.

    जळगाव : मान्सून काही दिवसांवर आल्याने शेतकरी राजा शेतातील मशागती करण्यात मग्न दिसत आहे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असल्याने सकाळी ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी शेतीकामात मग्न आहेत. जिकडे पाहावे तिकडे शेतात शेतकरी स्वतः व मजुरांच्या साह्याने शेतातील काम पूर्ण करण्यावर भर देत आहे.

    शेतातील कचरा जाळण्यात तर काही शेतकरी ठिबकच्या नळ्या अथण्यात व्यस्त आहे. येणाऱ्या पावसाळ्यात चोपडा तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांचा कापूस लागवडीकडे कल दिसून येत आहे. शेती कामासाठी मजूर भेटत नसल्याने शेतकरी राजा शेतातील काम करण्यासाठी मजूराविना हतबल होताना दिसत आहे. हवामान खात्याने या वर्षी मान्सून लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तविला असल्याने शेतकरी शेतीच्या मशागतीत जोमाने लागलेले दिसत आहे.