
यावर्षी कवठेमहांकाळ तालुक्यात पाऊसच दुष्काळाचे झाला नसल्याने सावट निर्माण झाले असून ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांनी शेतात कुळव धरल्याचे चित्र पहावयास मिळते आहे.यावर्षी पाऊसानेदांडी दिल्याने शेती ओसाड पडल्याने सध्या जनावरांना चारा व पिण्यासाठी पाणी नाही.
कवठेमहांकाळ : यावर्षी कवठेमहांकाळ तालुक्यात पाऊसच दुष्काळाचे झाला नसल्याने सावट निर्माण झाले असून ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांनी शेतात कुळव धरल्याचे चित्र पहावयास मिळते आहे.यावर्षी पाऊसानेदांडी दिल्याने शेती ओसाड पडल्याने सध्या जनावरांना चारा व पिण्यासाठी पाणी नाही. तालुक्यात खरीप हंगाम वाया गेला आणि रब्बी हंगाम सुध्दा वाया जाईल याची शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली असून शासनाने त्वरित चारा छावण्या सुरू कराव्यात अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
सन २००४ व २०१२ सालातील पडलेल्या दुष्काळाने कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटातसापडला आहे. पाऊस नसल्याने यावर्षी खरीप हंगाम वाया गेल्याने कडधान्याचा मोठया प्रमाणात तुडवडा निर्माण झाला असून भविष्यात कडधान्य मिळणे कठीण होवून जाईल सध्या तालुक्यातील घाटमाथ्यासह ढालगाव पूर्व भागात पाऊस नसल्याने खरिप पिकांची पेरणी झालीच नाही त्यामुळे सामान्य जनतेस मुग, मटकी, चवाळी, शेंग, धने, जवस, कार्याळ, तांबडा हुलगा, काळा हुलगा, तिळ, सूर्यफूल, करडई, इत्यादींसह प्रमुख कडधान्य मिळणार नाही. खरीप हंगाम नसल्याने तालुक्यात पाऊस नसल्याने सामान्य जनता आर्थिक संकटात सापडली असून घर खर्च चालवणे मुश्किल होईल अशी भयावह परिस्थिती तालुक्यातील जनते समोर येऊन ठेपली असून तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.