शेतकरी आंदोलन आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा संप, पोटासाठी दाही दिशा.., आमदारांचा पगार किती माहित्येय का?

शेतकऱ्यांना अनुदान आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणं अवघड अल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडं ही परिस्थिती विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या ठिकाणी राज्यातील सगळे आमदार एकत्र येतात. त्या आमदारांना किती वेतन आहे, याची माहिती एका माहिती अधिकार कार्यकर्त्यानं काढलीय.

मुंबई– राज्यात सध्या सरकारविरोधात (Government) प्रचंड नाराजीचं वातावरण दिसतंय. सरकारी कर्मचारी (government employees) आणि शेतकरी (Farmers) रस्त्यावर उतरलेले आहेत. जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्यातील १८ लाख कर्मचारी कालपासून संपावर आहेत. याचा परिणाम अत्यावश्यक सेवा, शिक्षण, आारोग्य या क्षेत्रांवर होण्यास सुरुवात झालेली आहे. तर शेतीमालाला हमी भाव नसल्यानं नाराज झालेले शेतकरी हे रस्त्यावर उतरलेले आहेत. शेतीमालाला योग्य भाव मिळावा म्हणून अन्नदानाची मागणी करण्यात येतेय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे राज्यात मोठे हाल झालेत. त्यानंतर आठवडाभराच्या गदारोळानंतर सरकारनं कांद्याला प्रतिक्विंटल ३०० रुपये अनुदानाची घोषणा केलीय. मात्र कापूस आणि इतर भाजीपाल्यांचं काय असा प्रश्न विचारण्यात येतोय. हे सगळं पोटसाठी करण्यात येतंय.

पगारवाढीसाठी आमदार एकत्र…

राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्यानं शेतकऱ्यांना अनुदान आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणं अवघड अल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडं ही परिस्थिती विधिमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या ठिकाणी राज्यातील सगळे आमदार एकत्र येतात. त्या आमदारांना किती वेतन आहे, याची माहिती एका माहिती अधिकार कार्यकर्त्यानं काढलीय.

किती आहे आमदारांना पगार

दिल्ली सरकारनं नुकताच आमदारांच्या वेतनात ६६ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. अशा स्थितीत महाराष्ट्रातील आमदारांना पगार किती आहे, हे पाहिले तर त्यांनाही मोठी रक्कम मिळत असल्याचं माहितीच्या अधिकारात समोर आलंय.

1. राज्यातील आमदाराला इन्कम टॅक्स वगळून प्रति महिना 2 लाख 71 हजार 947 इतका पगार आहे.
2. मूळ वेतन – 1,82,200
3. महागाई भत्ता 34 टक्के- 69,948
4. दूरध्वनी भत्ता- 8,000
5. स्टेशनरी, टपाल- 10,000
6. संगणक चालक-10,000
7. एकूण- 2,72,148
8. इतर दोन भत्ते धरुन पगार – 2,72,947