
महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडे 40 लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक असताना त्या संपूर्ण कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावायचा व दुसरीकडे आम्ही शेतकऱ्यांसाठी फार काही करतोय, असे दाखवीत केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा करायची, हे या समस्येवरील उपाय नाही. केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याने समस्या सुटणार नाही.
पुणे – शनिवारी केंद्र सरकारने (Central government) कांदा (onion) निर्यातीवर 40 टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसताहेत. कांद्या निर्यात शुल्क वाढीच्या निषेधार्थ आज राज्यभर आंदोलन करण्यात येत असतानाच, आता केंद्र सरकारने एक मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली आहे. यानंतर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनीही याबाबत माध्यमांशी संवाद साधला. (farmers of the state persisted in their protest demand of four thousand per quintal instead of two thousand four hundred ten rupess)
किसान सभा व शरद पवार गट आंदोलनावर ठाम
दुसरीकडे केंद्राने 2410 प्रतिक्विंटल या दराने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केल्यानंतरही राज्यातील शेतकरी आंदोलनावर ठाम आहे. अहमदनगरमध्ये किसान सभा आक्रमक झाली असून, “महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडे 40 लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक असताना त्या संपूर्ण कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावायचा व दुसरीकडे आम्ही शेतकऱ्यांसाठी फार काही करतोय, असे दाखवीत केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा करायची, हे या समस्येवरील उपाय नाही. केवळ 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याने समस्या सुटणार नाही. केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात कर रद्द करावा व त्यानंतर सरकारी कांदा खरेदी सारखे उपाय करावेत”, असं किसान सभेचे डॉ. अजित नवलेंनी म्हटलं आहे, तर पुण्यात शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे. याचे नेतृत्व खासदार अमोल कोल्हे करताहेत. केंद्राने 2410 प्रतिक्विंटल या दराऐवजी चार हजार दराने कांदा खरेदी करावी, अशी मागणी कोल्हेंनी केली आहे. जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलनवर ठाम असल्याचं कोल्हेंनी म्हटलं आहे.
2410 प्रतिक्विंटल असा कांद्याला दर…
“महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल”. असं टिव्ट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
शुल्क कमी नाहीच…
दरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांना भेटण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी जपानमधून ट्विट करत श्रेय घेणाचा प्रयत्न केला. मुंडेंच्या चर्चेपूर्वीच फडणवीसांनी आधीच गोयल, शहांशी चर्चा केली. अजित पवार गटाचला श्रेय मिळू दिलेलं नाही, अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, नाशिक, नगरमधून कांदा खरेदीसाठी विशेष केंद्र उभारणार असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं आहे. 2410 प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी होणार आहे. यापूर्वी 11 आणि 12 रुपयांत कांदा खरेदी करण्यात येत होता, तो आता 24 रुपयांनी नाफेड खरेदी करण्यात येणार आहे. 2 लाखांपेक्षा जास्त टन असेल तरीही कांदा केंद्र सरकार खरेदी करणार आहे. निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय मात्र केंद्रानं घेतलेला नाही.