महाराष्ट्रातील शेतकरी संघटनाही आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठीशी

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तोडगा न काढल्यास कार्यकर्त्यासोबत दुचाकीवरून दिल्लीला जाऊन आंदोलनांला पाठिंबा देण्याचा प्रहार संघटनेचा इशारा

नवी दिल्ली: मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला  महाराष्ट्रातील शेतकारी संघटनांनी पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध शहरामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी  व सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत आंदोलन केले आहे.

याशिवाय प्रहार शेतकरी संघटनेचे प्रमुख राज्यमंत्री बच्चू कडू(Bachchu Kadu ) यांनीही तीन डिसेंबरपर्यंत दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तोडगा न काढल्यास  दुचाकीने हजारो कार्यकर्ते घेऊन शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्ली जाऊ असा इशारा दिला आहे. केंद्र सरकारने सन्मानाने शेतकऱ्यां दिल्लीत येऊ द्यावे व त्यांच्याशी प्रामाणिक संवाद साधावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या विरोधात तयार करण्यात आलेले कायदे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात तयार करण्यात आलेले कायदे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने  (Central Government ) विशेष संसद सत्र बोलवण्याची मागणी क्रांतिकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी केली आहे.

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी विधेयकाच्या (Farmers in Delhi are protesting against the Agriculture Bill)विरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी मागील सात दिवसांपासून रस्त्यावर उतरले आहेत. तीव्र कडाक्याच्या थंडीतही हजारो शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.   दिवसेंदिवस आंदोलनाची दाहकता वाढत असल्याचे दिसून येत आहे.