उरणमध्ये भूसंपादनाच्या विरोधात शेतकऱ्यांचे सिडकोच्या विरोधात आंदोलन

आठ गावातून तिसऱ्या भूसंपादनाच्या विरोधात हरकती नोंदविणाऱ्या, सुमारे शेकडो शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास सिडको (Cidco) मुख्यालयाचे प्रवेशद्वार रोखले. यावेळी सिडकोचे कर्मचारी, अधिकारी आणि शेतकरी (Farmers) यांच्यात बाचाबाची झाली. दरम्यान, उरण तालुक्यातील आठ गावातून तिसऱ्या भूसंपादनाच्या विरोधात शेकडो शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे. यामुळं आंदोलन म्हणून सुमारे दोन तास सिडको मुख्यालयाचे प्रवेशद्वार शेतकऱ्यांनी रोखले.

    उरण : उरण (Uran) तालुक्यातील आठ गावातून तिसऱ्या भूसंपादनाच्या विरोधात हरकती नोंदविणाऱ्या, सुमारे शेकडो शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास सिडको (Cidco) मुख्यालयाचे प्रवेशद्वार रोखले. यावेळी सिडकोचे कर्मचारी, अधिकारी आणि शेतकरी (Farmers) यांच्यात बाचाबाची झाली. दरम्यान, उरण तालुक्यातील आठ गावातून तिसऱ्या भूसंपादनाच्या विरोधात शेकडो शेतकऱ्यांनी आवाज उठवला आहे. यामुळं आंदोलन म्हणून सुमारे दोन तास सिडको मुख्यालयाचे प्रवेशद्वार शेतकऱ्यांनी रोखले.

    दरम्यान, उरण तालुक्यातील पश्चिम विभागात मोडणाऱ्या बोकडविरा, चाणजे, नागाव, पागोटे, रानवड व फुंडे या गावातील उर्वरित जमिनीही सिडकोकडून संपादीत करण्यात येणार आहेत. त्याकरिता सिडकोच्या वतीने वृत्तपत्रातून अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे उरण मधील पश्चिम विभाग हा सिडको प्रकल्पग्रस्त होणार आहे. या सुचनेनंतर उरणमधील शेतकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम १२६ अन्वये भूसंपादनाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. परंतू या भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे, भूसंपादनाच्या विरोधात आगामी काळात मोठे आंदोलन उभा करु असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.