
आजरा तालुक्यातील आवंडी क्र.३ येथील सोनू बाबू कोकरे येनेहमी प्रमाणे गुरे चरण्यासाठी शुक्रवारी ( दि. २९ ) रोजी जंगलात घेऊन गेले असता दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गुरांच्या कळपांमध्ये पट्टेरी वाघाने अचानक हल्ला केला. या हल्यात बैल ठार झाला . या घटनेमुळे आजरा तालुक्यात खळबळ उडाली आहे
उत्तूर : आजरा तालुक्यातील आवंडी क्र.३ येथील सोनू बाबू कोकरे येनेहमी प्रमाणे गुरे चरण्यासाठी शुक्रवारी ( दि. २९ ) रोजी जंगलात घेऊन गेले असता दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गुरांच्या कळपांमध्ये पट्टेरी वाघाने अचानक हल्ला केला. या हल्यात बैल ठार झाला . या घटनेमुळे आजरा तालुक्यात खळबळ उडाली आहे .
अधिक माहिती अशी , वाघाने अचानक केलेल्या हल्ल्याने जनावरे भेदरली व सैरावैरा पळत सुटली… वाघाने एका बैलावर झडप घातलीच. . तर पळत जाणाऱ्या इतर दोन बैलांनी पाहिले त्याच क्षणी त्या दोन बैलांनी मिळून वाघावर हल्ला चढवला.वाघ आणि तीन बैलांची झटपट बराच वेळ सुरू होती.अखेर या झटापटीत बैलांनी वाघाला पळवून लावले. वाघ लांब जाऊन बसला.परंतु झालेल्या झटापटीत एक बैल मात्र ठार झाला.
सोनू बाबू कोकरे यांच्याडोळ्यासमोर घडत होती त्यांनी घाबरून मदतीसाठी आरडाओरडा केला. अखेर वाघ.बैलाला सोडून लांब जाऊन बसल्यावर सोनू कोकरे यांनी दोन बैल इतर जनावरे घेऊन घरी आले.आरडा ओरड केल्यामुळे आणि बैलांनी वाघाला प्रतिकार केल्यामुळे इतर जनावरांचा जीव वाचला व मोठे आर्थिक नुकसान टळल. अन्यथा वाघाने त्या दोन बैलासह इतर जनावरांनाही ठार मारले असते . यामध्ये ५० हजाराचे नुकसान झाले . या घटनेची नोंद आजरा वनविभागात झाली आहे .