शेतकऱ्यांनी जन आक्रोश पद यात्रेत सहभागी व्हावे : राजू शेट्टी

पदयात्रेत ताकद असते महात्मा गांधीनी मीठाच्या सत्त्यागृहासाठी पदयात्रा काढली.ब्रिटिश सरकारला झुकावे लागले. सांगली जिल्ह्यात जनआक्रोश पदयात्रा सुरू आहे. शेतकऱ्यांनी जन आक्रोश पद यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खा राजू शेट्टी यांनी केले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात ६०० किमी ची आणि २२ दिवसाची जन आक्रोश पद यात्रा सुरू आहे.

    कवठेमहांकाळ  : पदयात्रेत ताकद असते महात्मा गांधीनी मीठाच्या सत्त्यागृहासाठी पदयात्रा काढली.ब्रिटिश सरकारला झुकावे लागले. सांगली जिल्ह्यात जनआक्रोश पदयात्रा सुरू आहे. शेतकऱ्यांनी जन आक्रोश पद यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन माजी खा राजू शेट्टी यांनी केले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात ६०० किमी ची आणि २२ दिवसाची जन आक्रोश पद यात्रा सुरू आहे.  पद यात्रेच्या चौथा दिवशी शिरढोन येथे आयोजित सभेत ते बोलत होते. रविवारी ही पद यात्रा सलगरे कोंग्नोली करोली हिंगण गाव कवठेमहांकाळ मार्गे शिर दोन येथे आली. या वेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, टी. व्ही. पाटील, सरपंच शारदा पाटील, रजनीकांत पाटील, माणिक पाटील, कॉ दिगबर कांबळे उपस्थित होते.

    शेट्टी म्हणाले, ऊसाला चांगला भाव मिळावा, दुधाला हमीभाव दिला पाहिजे, द्राक्ष बेदाणा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला पाहिजे, शेतकऱ्याची कर्ज मुक्ती झाली पाहिजे, यासाठी महेश खराडे तळपत्या उन्हात पायाला भिंगरी बांधून चालत अाहेत. त्यांना साथ देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून पक्ष जात धर्म यांच्या भिंती भेदून ऊस द्राक्ष बेदाणा दूध डाळिंब भाजीपाला यासाठी खराडे यांच्याबराेबर चालावे. तुम्ही चालाल तर वाचाल. शेतकऱ्यांनी जो आपल्या हितासाठी लढतो आहे, त्याच्या पाठीशी राहिले पाहिजे.

    प्रास्ताविक दिगंबर कांबळे यांनी केले. यावेळी सूरज पाटील, शिवाजी पाटील, भरत चौगुले, बाळासाहेब लिंबेकाई, श्रीधर उदगावे, अजित हलिगळे, विश्वजित काळे, नितीन बागणे, स्वप्नील बागने, संदीप शिरोटे, अनिल वाघ, प्रशांत शिंदे, विजय पाटील, संपत पाटील, सचिन वाघ, शेतकरी उपस्थित होते.

     दर ठरल्याशिवाय कुणाला ऊस देवू नका
    महेश खराडे म्हणाले, यंदा ऊसाचे पीक फारच कमी आहे. देशासह जगात साखरेचा तुटवडा आहे. त्यामुळे ऊस नेण्यासाठी कारखानदारांची स्पर्धा लागणार आहे. त्यामुळे ऊस दर ठरल्याशिवाय कुणाला ऊस देवू नका. नाक दाबल्या शिवाय तोंड उघडणार नाही. गेली चार दिवस चालतो आहोत. आणखी १८ दिवस चालणार आहोत. तुम्ही या पद यात्रेत सहभागी व्हा. आम्ही चालतोय, तुम्हीही चाला असे आवाहन त्यांनी केले.