वाढत्या महागाईमुळे शेतकरी त्रस्त; उत्पादन खर्च गेला एकरी 25 ते 30 हजारांवर

खरीप हंगामातील कापणी (Kharip Crops) व मळणी जोमात सुरु आहे. मात्र, यंदाही उतारा एकरी 7 ते 10 क्विंटलच्या आसपास आहे. यंदाच्या 2183 प्रतिक्विंटल शासकीय बाजारभावाप्रमाणे एकरी उत्पन्न अनुक्रमे 15281 ते 21330 रुपयांचे होत असल्याचे दिसून येत आहे. तर उत्पादन खर्च एकरी 25 ते 30 हजारांचा झाल्याने शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

    गडचिरोली : खरीप हंगामातील कापणी (Kharip Crops) व मळणी जोमात सुरु आहे. मात्र, यंदाही उतारा एकरी 7 ते 10 क्विंटलच्या आसपास आहे. यंदाच्या 2183 प्रतिक्विंटल शासकीय बाजारभावाप्रमाणे एकरी उत्पन्न अनुक्रमे 15281 ते 21330 रुपयांचे होत असल्याचे दिसून येत आहे. तर उत्पादन खर्च एकरी 25 ते 30 हजारांचा झाल्याने शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे उत्पादन व खर्चाचा ताळमेळ बसविताना ‘आमदनी अठूनी, खर्चा रुपया’ अशी अवस्था झाली आहे.

    केंद्र शासनाने यंदा खरीपातील ‘ब’ ग्रेडच्या धानाला 2183 रुपये प्रतिक्विंटलचा भाव जाहीर केला आहे. गतवर्षी हा भाव 2040 रुपये होता. जिल्ह्यात अजूनपर्यंत काही धान खरेदी केंद्र सुरु झालेले नाहीत. त्यामुळे मळणी केलेले शेतकरी खरेदी केंद्र सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. खरेदी केंद्र सुरु न झाल्याने अनेक शेतकरी अडचणीमुळे खाजगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करत आहेत. धान विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु न झाल्याने अनेक शेतकरी उधार, उसणवार देण्यासाठी प्रत्येक हंगामात केंद्र सरकार शेतामलाचा प्रत्येक निशिचत करते.

    गेल्यावर्षापेक्षा केवळ 143 रुपयांची भाववाढ झाली. तर दुसरीकडे खते, कीटनाशके, बियाणे, मजुरी, मशागत व इंधनाचे दर दुप्पट तिप्पट वाढले आहेत. त्यातही कीड व रोगांमुळे उत्पादनात मोठी घट जाणवत आहे.

    यांत्रिकी शेतीने वाढला खर्च

    जिल्ह्यातील शेती व्यवसायात काळानुसार बदल होत आहे. आजचा शेतकरी पारंपारिक शेती कसण्यापेक्ष यांत्रिकी शेतीकडे वळला आहे. त्यातच खत आणि बियाण्यांच्या किमती भरमसाठ वाढले आहेत. किटकनाशकांचे दर गगनाला भिडले आहेत. इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्टरचे भाडेदेखील वाढले आहे. मजुरीचेही दर वाढल्याने शेती करणे परवडेनासे झाले आहे.