शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची सरकारवर टीका

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत (help) न मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. यातून ते टोकाचं पाऊल उचलतात. शेतकऱ्यांच्या या आत्महत्येला राज्य सरकार (state government) जबाबदार असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली. भंडारा जिल्ह्याच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर असताना ते बोलत होते.

    भंडारा : सततचा पाऊस, (rain) अतिवृष्टी (flood) व धरणाच्या पाण्यातून झालेल्या विसर्गामुळे आलेला पूर यामुळे शेतकऱ्यांना (farmers) तिबार पेरणी करावी लागली. यात शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत (help) न मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. यातून ते टोकाचं पाऊल उचलतात. शेतकऱ्यांच्या या आत्महत्येला राज्य सरकार (state government) जबाबदार असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली. भंडारा जिल्ह्याच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर असताना ते बोलत होते. (Bhandara tour)

    दरम्यान, कृषिमंत्री हे फक्त घोषणा करतात. सरकारने ३ हजार कोटींची मदत जाहीर केली, प्रत्यक्षात ३ रुपयांची मदतही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला. पूर्वी फक्त विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे वृत्त येत होते, आता विकसित भाग असलेल्या पुण्यातील जुन्नर मध्येही शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे वेदनदायी, दुःखदायी व अपमानजनक आहे. सरकार हे भगवान भरोसे काम करतोय. मुख्यमंत्री त्यांच अभिवचन विसरलेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्याऐवजी त्या कशा वाढतील हे सरकारचे धोरण आहे का? असा संतप्त सवाल दानवे यांनी उपस्थित केला.