शेतातील वीज कापल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांन घेतलं विष, फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न

बीडच्या गेवराई येथील एका शेतकऱ्याच्या शेतातली वीज महावितरणने कापल्यामुळे तो चिंतेत होता. या विवंचनेतूनच त्याने विष प्राशन केलं.

    बीड : कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येच्या घटना समोर येत असतात. मात्र, शेतकऱ्याने शेतातील वीज कापल्याच्या कारणावरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. फेसबुक लाईव्ह करत या शेतकऱ्याने विष प्राशन केलं. सध्या शेतकऱ्यांला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे

    बीडच्या गेवराई येथील एका शेतकऱ्याच्या शेतातली वीज महावितरणने कापल्यामुळे तो चिंतेत होता. या विवंचनेतूनच त्याने विष प्राशन केलं. फेसबुक लाईव्ह करत त्याने ॉ शेतात असलेल्या डीपीच्या शेजारीच विष प्राशन केलं. तर हे लाईव्ह पाहून गावातील तरूणांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तर महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.