शेतकरी विठ्ठल रांजणे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी; धरणग्रस्तांसह शेतकरी संघटनेचे तीव्र आंदोलन

बरड (ता. फलटण) येथील शेतकरी जमीनदाराने जावळी तालुक्यातील महू धरणग्रस्त विठ्ठल रांजणे यांना दमदाटी देत मारहाण करण्याचा प्रयत्न करत आपल्या जमीनीतून धुडकावून लावले व त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, अशा लोकांवर तात्काळ पोलिसांनी गुन्हे दाखल करत कारवाई करावी.

    पाचगणी : बरड (ता. फलटण) येथील शेतकरी जमीनदाराने जावळी तालुक्यातील महू धरणग्रस्त विठ्ठल रांजणे यांना दमदाटी देत मारहाण करण्याचा प्रयत्न करत आपल्या जमीनीतून धुडकावून लावले व त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, अशा लोकांवर तात्काळ पोलिसांनी गुन्हे दाखल करत कारवाई करावी, अशी मागणी धरणग्रस्त व शेतकरी संघटनेने आंदोलन करत केली.

    लाभार्थी धरणग्रस्त विठ्ठल रांजणे यांना पुनर्वसनाची जमीन ताब्यात न मिळाल्याच्या कारणाने त्रस्त झालेले शेतकरी विठ्ठल रांजणे यांनी आत्महत्येचा प्रयत्ना केला. यावरूनच त्यांची प्रकृती गंभीर झाली.

    या सर्व प्रकारातून जावळी तालुक्यातील महू धरण परिसरातील धरणग्रस्त व ग्रामस्थ व शेतकरी संघटना या सर्व प्रकारावर कमालीचे संतप्त होत आज दुपारी बाराच्या सुमारास महू धरणाच्या भिंतीवर जाऊन कृष्णा खोरे पाटबंधारे विभाग व प्रशासनाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी आणि आंदोलन केले.

    रांजणी येथील धरणग्रस्त विठ्ठल रांजणे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.

    रांजणी तालुका जावळी येथील विठ्ठल रांजणे यांना महू धरणग्रस्त म्हणून पुनर्वसनात फलटण तालुक्यातील बरड गावांमध्ये जमीन मिळाली होती.

    जमीन ताब्यात घेण्यासाठी अनेक वेळा शेतकरी धरणग्रस्त विठ्ठल रांजणे यांनी प्रयत्न केला. मात्र, संबंधित बरड गावातील ताब्यात असणारे शेतकरी जमीनदार व काही दलाल यांनी अद्यापही धरणग्रस्त म्हणून हक्काची मिळालेली बरड गावातील सदर जमीन धरणग्रस्त विठ्ठल रांजणे यांना ताब्यात दिलीच नाही.

    प्रशासनाचे अनेक वेळा उंबरे विठ्ठल रांजणे यांनी झिजवले. मात्र, त्यांना न्याय मिळालाच नाही. यासाठी त्यांनी शेवट या सर्व घटनांना कंटाळून पुनर्वसनात मिळालेल्या जमिनीमध्येच आपल्या कुटुंबासमवेत उभे राहून याच जमिनीत स्वतःची जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अत्यंत विषारी असणारे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत वीष पिल्याने त्यांची प्रकृती खालावली व तात्काळ त्यांना फलटण येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले.