आषाढ सरींनी बळीराजा सुखावला; 70 टक्के पावसानंतर पेरणी करण्याचे आवाहन

जूनच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात बहुतांश ग्रामीण भागात तुरळक ते मध्यम स्वरूपात पावसाने (Rain News) हजेरी लावली. मान्सूनपूर्व काळात मे जून दरम्यान वळवाच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यावर खरीपपूर्व मशागतीस बळ मिळाले. परंतु, नंतर मृग व आर्द्रा नक्षत्रात मात्र पावसाने दडी मारली. त्यामुळे खरीपांतर्गत ज्वारी बाजरी, उडीद मूग आदी तृणधान्याच्या पेरण्या खोळवल्या होत्या.

    जळगाव : जूनच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात बहुतांश ग्रामीण भागात तुरळक ते मध्यम स्वरूपात पावसाने (Rain News) हजेरी लावली. मान्सूनपूर्व काळात मे जून दरम्यान वळवाच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यावर खरीपपूर्व मशागतीस बळ मिळाले. परंतु, नंतर मृग व आर्द्रा नक्षत्रात मात्र पावसाने (Rain) दडी मारली. त्यामुळे खरीपांतर्गत ज्वारी बाजरी, उडीद मूग आदी तृणधान्याच्या पेरण्या खोळवल्या होत्या.

    तालुक्यासह ग्रामीण भागात शेतकरी खरीप हंगामासाठी तयारी करत असून, बहुतांश ठिकाणी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली आहेत. आर्द्रा नक्षत्राच्या शेवटी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गांचा उत्साह दुणावला असून पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतिक्षा मात्र कायम आहे. जूनच्या अखेर जिल्हयात तुरळक प्रमाणात का होईना मान्सूनने हजेरी लावली.

    जळगाव शहरात तुरळक प्रमाणात शिडकावा झाला, मात्र ग्रामीण भागात दुपारी पावसाचा १२/१ वाजेपर्यंत पावसाचा मागमूस नव्हता. त्यानंतर मात्र अचानक वातावरण बदलून रिमझिम पावसाला सुरूवात झाली. मात्र, दिवसभर अभ्राच्छादित वातावरण व दुपारनंतर पावसाची रिपरिप सुरूच होती. शहरातील ४० ते ४५ अंशावर पोहचलेल्या तीव्र तापमानाच्या उकाड्यातून तुरळक पर गारव्यामुळे शेतकरी व नागरीकांना दिलासा मिळाला आहे.