
दीर्घ प्रतिक्षेनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यानंतर गुरुवारी अमरावती जिल्ह्यात चांगलाच दमदार पाऊस (Heavy Rain) बरसला. दिवसभर शहरासह ग्रामीण भागात अनेक तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्याने पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अमरावती : दीर्घ प्रतिक्षेनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यानंतर गुरुवारी अमरावती जिल्ह्यात चांगलाच दमदार पाऊस (Heavy Rain) बरसला. दिवसभर शहरासह ग्रामीण भागात अनेक तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्याने पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जोरदार पाऊस पडल्यामुळे शेतकरीसुध्दा सुखावल्याचे दिसत आहे. अशातच पश्चिम विदर्भात 5 सप्टेंबरपासून पावसाचा जोर पुढील आठवडाभर कायम राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे.
हवामान अंदाजानुसार, 13 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण विदर्भात पाऊस पडेल. 9 सप्टेंबरपर्यंत विदर्भात बहुतांश ठिकाणी 10 आणि 11 सप्टेंबरला अनेक ठिकाणी आणि 12 आणि 13 सप्टेंबरला काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि हवामान खात्याने विदर्भात 9 सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी केला आहे. यंदा पावसाच्या अंदाजानुसार, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाखो हेक्टरमध्ये सोयाबीन, कपाशी, तूर पिकांचा पेरा केला होता. मात्र, पावसाने 3 आठवडे दडी वाढ झाली आहे.
तापमानात घट
या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली. तसेच वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासूनसुध्दा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आल्हाददायक झाले आहे. गेल्या आठवड्यात उष्णतामान वाढले होते. पावसाळ्याच्या दिवसांतही उन्हाळ्या इतकाच सूर्य प्रखर होता. त्यामुळे आठवड्याभरापूर्वी जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान 36.6 डीग्री सेल्सिअसवर पोहोचले होते. जे आता 30 अंशांपर्यंत घसरले आहे.