Farmers will get incentive amount, 30 thousand farmers of the district will get benefits

प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेवून त्यांनी एक किंवा अनेक बॅँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेवून ५० हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल. २०१८, २०१९, २०२० या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जापैकी दोन वर्ष नियमित व पूर्णत: परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

  गोंदिया : शेतकरी प्रतिकूल परिस्थितीतही हाडाची काठी अन् रक्ताचे पाणी करून शेतात कबाडकष्ट करून पीक घेतो. मात्र, निसर्गाच्या दृष्ट चक्रामुळे अनेकदा हतबल होतो. अतिवृष्टी, अवर्षण, किडींचा प्रादुर्भाव यामुळे गत काही वर्षात शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. अशाही परिस्थितीत बहुतांश शेतकरी पीक कर्जाची प्रामाणिक परतफेड करतात. जिल्ह्यात नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकऱ्यांची संख्या जवळपास ३० हजार आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत निधी जमा केला जाणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय (Government decision ) शुक्रवार, २९ जुलै रोजी जारी करण्यात आला आहे.

  शेती व शेतीशी निगडीत कामांकरिता शेतकरी व्यापारी बँका (Commercial bank) आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकाकडून (District Central Cooperative Bank) पीककर्ज घेतात. २०१५ ते २०१९ या काळात राज्यातील विविध भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. नैसर्गिक आपत्तीच्या पृष्ठभूमीवर शेतकऱ्याचे नुकसान झाल्यामुळे मागील काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होवू शकली नाही.

  परिणामी, शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दृष्टचक्रात अडकलेले आणि त्यांना शेतीसाठी नव्याने पीककर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या. तत्कालीन शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्याअंतर्गत अल्प मुदतीच्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहनपर देण्याची घोषणा २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती. मात्र, कोविडच्या (covid) पृष्ठभूमीवर राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने आश्वासनाची पूर्तता झाली नव्हती. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी तरतुद करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात (Gondia District) नियमितपणे पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३० हजारांच्या वर आहे. या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

  या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

  प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेवून त्यांनी एक किंवा अनेक बॅँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेवून ५० हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल. २०१८, २०१९, २०२० या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीककर्जापैकी दोन वर्ष नियमित व पूर्णत: परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

  तसेच ५० हजारापेक्षा कमी अल्पमुदत पीककर्ज असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी २०१८ – १९ अथवा २०१९-२० या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या पीककर्जाच्या मुद्दल रक्कम इतका प्रोत्साहन लाभ देण्यात येईल. सोबतच २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरात झालेल्या नुकसानीमुळे कर्जमाफीचा लाभ घेतलेले व मृत शेतकऱ्याच्या वारसानी कर्जाची परतफेड केली अशा वारसदारांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.